Year Ender 2024: यावर्षी 'या' बाईक्सने मार्केटला केले टाटा बाय बाय, आता दिसणार सुद्धा नाहीत
2024 चे वर्ष ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी खूप आशादायक ठरले. या वर्षी आपण अनेक उत्तम वाहनं पाहिलीत. त्यातही अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या वाहनांसोबत काही नवीन प्रयोग केले आणि ते मार्केटमध्ये यशस्वी सुद्धा झाले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बजाजची सीएनजी बाईक, फ्रीडम 125. ही बाईक जगातील पहिली सीएनजी बाईक आहे. अशा मार्केटमध्ये अनेक उत्तम बाईक्स लाँच झाल्या आहेत. परंतु, यावर्षी काही बाईक्स बंद सुद्धा पडल्या आहेत.
या वर्षी अनेक नवीन बाईक्स बाजारात आणल्या गेल्या असतानाच काही बाईक्सही मार्केटमधून काढून टाकण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया, या वर्षी कोणत्या कंपनीने कोणती बाईक बाजारातून काढून टाकली आहे.
18 वर्ष जुनी स्कूटर, तरी सुद्धा मार्केटमध्ये सुसाट, 6 मिलियन उत्पादनाचा टप्पा केला पार
वृत्तानुसार, 2024 मध्ये भारतीय मार्केटमधून चार बाईक काढून टाकण्यात आल्या आहेत. यापैकी एक बाइक जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडा मोटरसायकलची आहे आणि तीन बाइक हीरो मोटोकॉर्पच्या आहेत. या कंपन्यांनी एका वर्षात चार बाइक्सची विक्री बंद केली आहे, पण त्यांच्या जागी आणखी चांगले पर्याय बाजारात आणले गेले आहेत. या कंपन्या 2025 मध्ये काही बाइक अधिकृतपणे लाँच केल्या जाऊ शकतात.
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda Motorcycle कडून भारतीय बाजारपेठेत अनेक उत्कृष्ट बाईक विकल्या जात असल्या तरी, कंपनीने 2024 या वर्षात त्याच्या एका बाईकची विक्री बंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने यावर्षी होंडा एक्स-ब्लेड नावाची बाईक बाजारातून काढून टाकली आहे. ही बाईक पहिल्यांदा 2018 मध्ये सादर करण्यात आली होती. जी Honda CB Hornet 160 बाईकवर तयार करण्यात आली होती. यात 162 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 81 हजार रुपये आहे.
कार मालकांनो लक्ष द्या, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किंमती झाल्या जाहीर, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
जरी कमी बजेट सेगमेंटमध्ये Hero MotoCorp द्वारे अनेक बाईक्स ऑफर केल्या जात असल्या तरी यावर्षी Hero Passion Xtec बाईक कंपनीने बंद केली आहे. विक्रीत सातत्याने घट होत असल्याने ही बाईक बाजारातून काढून टाकण्यात आली आहे. यात 113.2 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले होते आणि त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 82 हजार रुपये होती.
Hero MotoCorp ची दुसरी बाईक म्हणून Xpulse 200T बाईक देखील बाजारातून काढून टाकण्यात आली आहे. यामध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले होते, ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा समावेश होता. याला 199.5 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले होते आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 1.37 लाख रुपये होती. नवीन एक्स्ट्रीम 210 या बाइकची जागा घेणार आहे.
Hero Xtreme 200S 4V ही तिसरी बाईक आहे जी हिरोने बाजारातून काढून टाकली आहे. सततच्या कमी विक्रीमुळे ही बाईक 2024 मध्ये बाजारातून काढून टाकण्यात आली आहे. यात 200 सीसी इंजिन देखील होते आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 1.43 लाख रुपये होती. त्याची जागा नवीन बाइक Xtreme 250R घेईल.