Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BS6 नंतर आता BS7 वाहनं मारकेमध्ये येणार? जाणून घ्या हे बीएस नॉर्म्स असते तरी काय?

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात रोज अनेकानेक वाहनं लाँच होत आहे. अशावेळी आपण नेहमी ऐकतो की या अमुक कारमध्ये बीएस 6 इंजिन असते. पण अनेकांना याचा अर्थ विचारला की, त्यांना याब्ब्दल काहीही ठाऊक नसते. अशातच आता BS7 वाहने लवकरच बाजारात येऊ शकतात अशी चर्चा होताना दिसत आहे. तुमच्याही मनात जर हा प्रश्न असेल तर आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 23, 2024 | 05:50 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

पूर्वी कार किंवा बाईक घेताना अनेक जण त्याचे मायलेज आणि किंमतीवर जास्त लक्ष केंद्रित करायचे. पण आजचा ग्राहक वाहनांच्या विविध पार्ट्सवर लक्ष देताना दिसतो. यातीलच एक महत्वाचा पार्ट म्हणजे वाहनाचे इंजिन.

जर तुम्ही नीट लक्ष दिले असेल तर कार किंवा बाईक खरेदी करताना शोरुममधील व्यक्ती आपल्याला हे बीएस 6 इंजिन आहे असे आवर्जून सांगताना दिसते. पण बीएस म्हणजे काय?

बीएस (भारत स्टेज) नॉर्म्स हे भारतातील वाहन उत्सर्जन मानकांचा एक संच आहे, जे केंद्र सरकारने प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी लागू केले आहे. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणाची पातळी किती असावी हे नॉर्म्स ठरवतात. बीएस नॉर्म्स युरोपियन उत्सर्जन मानकांवर आधारित आहेत आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी ते अपडेट केले जातात.

हे देखील वाचा: महिना 25 हजार कमावणाऱ्या ‘या’ ट्रक चालकाने अडीच वर्षात बांधले 1 कोटींचे घर, जाणून घ्या हे कसे शक्य झाले?

बीएस नॉर्म्सचा इतिहास:

BS1: 2000 मध्ये लागू.
BS2: 2005 मध्ये लागू.
BS3: 2010 मध्ये लागू.
BS4: 2017 मध्ये लागू.
BS6: 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला. (BS5 वगळण्यात आले होते)

BS6 नंतर आता BS7 वाहनं येणार?

BS6 मधील नियमांनी नायट्रोजन ऑक्साईड्स (NOx), हायड्रोकार्बन्स (HC), पार्टिक्युलेट मॅटर (PM) आणि वाहनांमधून उत्सर्जित कार्बन मोनोऑक्साइड (CO) चे स्तर पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत. या नियमानुसार, डिझेल वाहनांसाठी पार्टिक्युलेट मॅटर उत्सर्जन 80% आणि NOx उत्सर्जन 70% ने कमी झाले आहे.

ब्स७ नॉर्म्सच्या शक्यतेबद्दल बोलताना, त्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारने अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आज पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने वाढती पावले लक्षात घेता, भविष्यात BS7 मानकांची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा: हिरोकडून 2024 Hero Glamour बाईक लॉंच! 125 cc रेंजमध्ये होणार कडवी टक्कर, जाणून घ्या नव्या बाईकबद्दल

बीएस नॉर्म्सचे महत्त्व:

वाहनांमधून उत्सर्जित होणारे प्रदूषण नियंत्रित करणे. तसेच पर्यावरणातील हानिकारक वायूंचे उत्सर्जन कमी करणे हा बीएस नियमांचा मुख्य उद्देश आहे.बीएस इंजिन तुमच्या कारला अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल बनवतात. ज्यामुळे तुमची कार किंवा बाईक पर्यावरणपूरक होईल.

BS7 नियमांकडे जाण्यापूर्वी, सरकार आणि वाहन उत्पादक कंपनीज तांत्रिकदृष्ट्या तयार होण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून जेव्हा हे नियम लागू केले जातील तेव्हा त्यांच्यानुसार कार्स आणि बाईक्स बनवता येतील.

Web Title: Bs7 vehicle will be coming into the market soon after bs6 read the norms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Bike Engine

संबंधित बातम्या

कायनेटिक ग्रीन आणि IIFL समस्त फायनान्समध्ये करार! देशभरात EV अवलंबनाला गती
1

कायनेटिक ग्रीन आणि IIFL समस्त फायनान्समध्ये करार! देशभरात EV अवलंबनाला गती

तुमच्या बाईकमध्ये ‘हा’ बदल दिसला की समजून जावा इंजिन ऑइल बदलण्याची वेळ आली
2

तुमच्या बाईकमध्ये ‘हा’ बदल दिसला की समजून जावा इंजिन ऑइल बदलण्याची वेळ आली

Liquid Cooling: 100-125cc बाईक्समध्ये का दिले जात नाही लिक्विड कूल्ड इंजिन, काय आहे कारण
3

Liquid Cooling: 100-125cc बाईक्समध्ये का दिले जात नाही लिक्विड कूल्ड इंजिन, काय आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.