फोटो सौजन्य: YouTube
आपल्या बाजूला असे अनेक लोकं आहेत ज्यांची कमाई जेम थेम काही हजारांच्या घरात असते. या कमी पैश्यामुळे त्यांना आपली व आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यास अडथळा येत असतो. आपलं स्वतःच घर बांधणं हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचं स्वप्न असतं. हेच स्वप्न झारखंडच्या राजेश रवानी यांनी फक्त अडीच वर्षात पूर्ण केले आहे. चला जाणून घेऊया हे कसे शक्य झाले आहे.
राजेश रवानी हे एक ट्रक ड्रायवर आहे. त्याच्या दिवसातला निम्मा वेळ ते ट्रक चालवण्यात घालवतात. राजेश यांना पाककलेची खूप आवड आहे. ते नेहमीच निरनिराळे पदार्थ आपल्या हाताने बनवत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपले युट्युब चॅनेल सुरु केले. या चॅनेलवर ते आपल्या ट्रकमध्ये निरनिराळे पदार्थ बनवायचे. लवकरच त्याच्या चॅनेलचे सबस्क्रायबर्स वाढू लागले व त्यांची युटूबवरून कमाई सुद्धा चालू झाली. आज याच त्यांच्याब युट्युब चॅनेलमुळे त्यांनी 1 कोटी रुपयांचे घर अडीच वर्षांत बांधले आहे.
हे देखील वाचा: या 5 एक्सेसरीजच्या साहाय्याने बनवा तुमच्या कारला एकदम टॉपची मॉडेल
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत राजेश रवाणी यांनी ट्रक ड्रायव्हर असताना 1 कोटी रुपयांचे घर कसे बांधले याचा खुलासा केला. राजेश रवाणी यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून ट्रक चालवत आहेत आणि ट्रक चालवताना त्यांची मासिक कमाई 25,000 ते 30,000 रुपये असते.
ट्रक ड्रायव्हर असण्यासोबतच राजेश रवाणी सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. राजेश रवाणी यांचे स्वतःचे YouTube चॅनेल देखील आहे, ज्यामध्ये ते त्यांचे ट्रक चालवण्याशी संबंधित सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतात. राजेश रवाणी यांचे सध्या YouTube वर 1.89 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या चॅनलवरून 914 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.
राजेश रवाणी यांनी सांगितले की, हे यूट्यूब चॅनल त्याच्या मुलांनी तयार करून दिले होते. राजेश रवाणी यांनी सांगितले की, एकदा ते कामानिमित्त बाहेर असताना त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला होता आणि तो आपल्या मुलाला पाठवला होता. राजेश याना न सांगता त्याच्या मुलाने तो व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून टाकला. व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या मुलांनी व्हिडिओ अपलोड करणे सुरूच ठेवले. आज याच युट्युब चॅनेलमुळे राजेश दर महिन्याला यूट्यूबवरून चार ते पाच लाख रुपये कमावत आहे.