Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रात घ्या करिअरची उत्तुंग भरारी !

वाहन उत्पादन, सेवा, विक्री, तसेच तांत्रिक नाविन्य यामध्ये सतत सुधारणा होत असल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जाणून घ्या त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Nov 12, 2024 | 11:40 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

ऑटोमोबाईल क्षेत्र हे आधुनिक युगातील सर्वात महत्वाचे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. गेल्या काही दशकांमध्ये या क्षेत्रात कमालीचे बदलही पाहायला मिळत आहेत. या बदलांसोबत क्षेत्रामधील संधींचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.  वाहन उत्पादन, सेवा, विक्री, तसेच तांत्रिक नाविन्य यामध्ये सतत सुधारणा होत असल्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एकेकाळी फक्त मोठ्या वाहन उत्पादक कंपन्या या क्षेत्रात होत्या, आता मात्र  ईव्ही वाहन निर्मितीपासून , तांत्रिक सेवा आणि संगणकीय प्रणाली यांच्यामुळेही विविध क्षेत्रात काम करण्याचे पर्याय निर्माण झाले आहेत.

हे देखील वाचा- WangonR चे हायब्रीड मॉडेल 2025 मध्ये होणार लॉंच! कारच्या नवीन जनरेशनमध्ये असणार हे बदल

ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक शिक्षण

ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध शैक्षणिक पर्याय  उपलब्ध आहेत. यामध्ये मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी ( Engineering)  यांचा समावेश होतो. अभियांत्रिकी अभ्यासक्रमानंतर उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही  विशेष अभ्यासक्रम केले जाऊ शकतात. तांत्रिक ज्ञानाबरोबरच संगणकीय कौशल्ये, डेटा विश्लेषण, डिजाईन सॉफ्टवेअरचे ज्ञान (जसे CAD, CAM) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचेही महत्त्व वाढले आहे. त्यामुळे  पदवीसोबतच या तांत्रिक ज्ञानाशी निगडीत कोर्स केल्यास त्याचा फायदा होताना दिसत आहे.

हे देखील वाचा- CNG कार घेण्याचा विचार करताय? ‘या’ आहेत बेस्ट गाड्या

क्षेत्रामधील नवनवीन संधी

इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढल्यामुळे या क्षेत्रात तंत्रज्ञान आणि संशोधनाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. तसेच, सोलर वाहने, ऑटोनॉमस कार, आणि स्वच्छ इंधनांवर चालणारी वाहने विकसित करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा सायन्स, वाहनांच्या ऑटोमेशन सिस्टीमसाठी AI, सेन्सर्स आणि IoT या तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जातो. या सर्व गोष्टींमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात विविध प्रकारच्या जॉब्सची मागणी आहे, जसे की प्रोडक्ट डिझायनर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, रिसर्च इंजिनियर, सप्लाय चेन मॅनेजर, आणि सॉफ्टवेअर इंजिनियर इत्यादी.

आज जगभरात अनेक कंपन्या ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतातील नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कौशल्यपुर्ण मनुष्यबळाची मागणी असते. त्यामुळे या क्षेत्रात देशातही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. हे क्षेत्र सतत बदलत असलेले आहे आणि त्यात टिकून राहण्यासाठी तांत्रिक कौशल्यांचे अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच, नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यांच्या वापरामुळे वाहन निर्मिती प्रक्रिया अधिक जटिल झाली आहे. इंधनाच्या किमती, पर्यावरणीय नियमावली, आणि ग्राहकांची बदलती अपेक्षाही या क्षेत्रातील मोठी आव्हाने असली तरीही या क्षेत्रामध्ये नवनवीन विकासात्मक बाबी होत आहेत. त्यामुळे जर तुमचे लक्ष्य निर्धारित असेल तर या क्षेत्रात तुम्ही उतुंग भरारी घेऊ शकता.  करिअर करिता ऑटोमोबाईल क्षेत्र हे सर्वोत्तम क्षेत्रही ठरु शकते.

 

Web Title: Career opportunities in the worlds fastest growing automobile sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 11:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.