फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील विक्रीमध्ये अव्वल असणारी कंपनी मारुती सुझुकीच्या कार्सनी अनेक दशके देशातील ग्राहकांवर राज्य केले आहे. बजेट कार आणि कारमधील वैविध्यपुर्ण प्रकारामुळे ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद या कारना मिळाला आहे. अल्टो 800, अर्टिगा, वॅगन आर, स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर अशा कंपनीच्या अनेक कार आहेत ज्यांनी भारतीय बाजारपेठेत इतिहास रचला आहे. आता कंपनीकडून नवीन जनरेशन वॅगन आर कार लॉंच करण्याची तयारी सुरु आहे. जाणून घ्या याबाबत
मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार असणारी वॅगन आर ही मध्यमवर्गीयांची आवडती कार आहे. ही कार बॉक्सी केबिनच्या रूपात एक विशिष्ट शैली ऑफर करते. वॅगन आरची सध्याची जनरेशन ही या कारची तिसरी जरनरेशन आहे आणि ती CNG पर्यायासहितही उपलब्ध आहे. तथापि, मीडिया रिपोर्ट्नुसार, कारची नवीन जनरेशन ही संपूर्ण हायब्रीड असणार आहे.
Wagon R च्या नव्या जनरेशनचे इंजिन
या रिपोर्ट्नुसार नवीन जनरेशन Suzuki WagonR ही पहिली मिनी-कार असेल जी कंपनी हायब्रिड सेटअपसह ऑफर करणार आहे. नवीन हॅचबॅक इनलाइन 3 DOHC, 0.66-लिटर हायब्रिड इंजिन ऑफर करेल. ICE इंजिन 54PS जनरेट करणार आहे, तर इलेक्ट्रिक मोटर 10PS जनरेट करेल. तर कारचे टॉर्क आउटपुट अनुक्रमे 58Nm आणि 29.5 Nm असेल. कारमध्ये इलेक्ट्रिक कंटिन्युटी व्हेरिएबल ट्रान्समिशन (eCVT) असेल.
Wagon R ची रचना
मारुती सुझुकी वॅगन-आरचे जपान मधील व्हेरिएंट हे पूर्णपणे हायब्रिड रचनेत असणार आहे. कारची 3395 मिमी लांबी, 1475 मिमी रुंदी आणि 1650 मिमी उंची असणार आहे. वॅगन आर कारचा व्हीलबेस हा 2460mm असेल तर कर्बचे वजन हे 850 kg असणार आहे. जपानच्या व्हेरिएंटमध्ये तेथील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सरकते दरवाजे असतील. नवीन जनरेशन Wagon-R ही 2025 मध्ये सुरुवातीच्या महिन्यात लॉंच होण्याची अपेक्षा करण्यात येत आहे.
Wagon R ची किंमत, कार्यक्षमता
कारच्या उत्सर्जनाचा विचार केल्यास, ICE च्या तुलनेत सुझुकी वॅगनआर फुल हायब्रिडचे उत्सर्जन कमी असेल. WagonR हायब्रीडची रनिंग कॉस्ट ही ICE ट्रिमपेक्षा कमी असेल. या कारची कार्यक्षमता ही उत्तम असण्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र त्याबद्दल कारच्या लॉंचिग नंतरच कळेल. ग्रँड विटारा हायब्रिड 27.97 kmpl ची इंधन-कार्यक्षमता देते आणि हे WagonR (म्हणजे 25.19 kmpl) पेक्षा चांगले आहे. WagonR हायब्रीडचे मायलेज 30 kmpl असू शकते. सध्याचे कारचे सीएनजी (CNG) प्रकार 33.47 किमी/किलो मायलेज देते. ही कार भारतामध्ये लॉंच झाल्यास या कारची एक्स शोरुम किंमत ही अंदाजे 10 लाखांच्या आत असू शकते.