Alto ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
ही गाडी पाहिली की तुम्हाला क्षणात Maruti Alto ची आठवण येईल. इतकी छोटी, कॉम्पॅक्ट आणि शहरात वापरण्यासाठी एकदम सोपी. छोट्या फॅमिलीसाठी, रोजच्या ऑफिसच्या प्रवासासाठी ही गाडी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. पण एक गोष्ट आहे, ही गाडी भारतात कधी लाँच होणार हे कंपनीने अजून जाहीर केलेलं नाहीये.
ही काही काल-परवा आलेली गाडी नाही. Citroen 2CV पहिल्यांदा 1948 मध्ये लोकांसमोर आली होती. जवळपास 78 वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा तिचं डिझाईन एकदम साधं-सुधं होतं, किंमत खिशाला परवडेल अशी होती. त्यामुळे युरोपमध्ये घराघरात ही गाडी दिसायची. लोकांची ती फेवरेट बनली होती.
आता कंपनी त्याच जुन्या नावाला आणि आठवणीला नव्या टेक्नॉलॉजीची जोड देत आहे. आधी ती पेट्रोलवर धावायची, आता ती पूर्णपणे चार्जिंगवर धावणार. पॅरिस मोटर शो मध्ये जेव्हा तिचा कॉन्सेप्ट दाखवला गेला, तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिनेच खेचून घेतलं होतं. जर ही गाडी खरंच मार्केटमध्ये आली तर छोट्या EV च्या दुनियेत मोठी उलथापालथ होणार हे नक्की.
नवीन 2CV ची लांबी ऐकून तुम्ही हैराण व्हाल, फक्त 3.76 मीटर. म्हणजे एकदम छोटी हॅचबॅक. कंपनीच्या युरोपमधील गाड्यांमध्ये बघायचं झालं तर ती Ami आणि C3 च्या मधोमध असेल.
Lightweight Helmet: 1050 ग्रॅम वजनाचं हलकं हेल्मेट अनावरण; सुरक्षेच्या वैशिष्ट्यांमुळे चर्चेत
Citroen चा सगळ्यात मोठा प्लॅन म्हणजे तिचं वजन 1000 किलोच्या आत ठेवायचं. विचार करा, गाडी जितकी हलकी तितकी बॅटरी कमी वापरणार आणि रेंज जास्त मिळणार.
बॅटरीची किंमत कमी, सर्व्हिसिंगचा खर्च कमी, म्हणजे सर्वसामान्य माणसालाही ही EV घेणं शक्य होईल.लूक बद्दल बोलायचं तर कंपनी जुन्या 2CV चा तोच गोल-मटोल, गोड लूक कायम ठेवणार आहे, पण आतमध्ये मात्र सगळे नवे फीचर्स, मोठी स्क्रीन, नवं डॅशबोर्ड असं सगळं देणार आहे. जुन्या काळाची डिझाईन आणि आजचं तंत्रज्ञान याचा भारी मेळ असेल.
आपल्याकडे Alto, WagonR का चालतात? कारण त्या छोट्या आणि स्वस्त आहेत. तसंच Citroen 2CV पण आहे. त्यामुळे ती भारतात आली तर नक्कीच लोकांना आवडेल.ऐकायला मिळतंय की कंपनी दोन व्हर्जनवर काम करतेय, एक नेहमीसारखी हॅचबॅक आणि दुसरी छोटी पिकअप सारखी. पण यातलं कोणतं मॉडेल भारतात येणार, हे अजून काहीच ठरलेलं नाही.
Cheapest Car in India: फक्त 5.29 लाखांत मिळतेय कार, फीचर्स पाहून ग्राहक आकर्षित
युरोपसाठी या गाडीची किंमत कंपनी 15,000 युरो ठेवण्याचा विचार करत आहे. म्हणजे भारतीय पैशात पकडलं तर जवळपास 16 लाख रुपये. पण ही युरोपची किंमत आहे. भारतात जर लोकल मॅन्युफॅक्चरिंग झालं तर किंमत खूपच कमी होईल.सध्या तरी भारतातल्या लॉन्चिंगची तारीख, किंमत किंवा बुकिंग याबद्दल कंपनीकडून एकही अधिकृत माहिती आलेली नाही. पण ज्या वेगाने भारतात EV वाढत आहेत, ते पाहता Citroen लवकरच काहीतरी गुड न्यूज देईल असं वाटतंय. तुम्ही पण कमी बजेटमध्ये चांगली, दिसायला क्युट आणि चालायला स्वस्त अशी EV शोधत असाल तर या गाडीवर लक्ष ठेवून राहा.
Ans: भारतातील लॉन्चिंगची तारीख कंपनीने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
Ans: युरोपमध्ये या कारची संभाव्य किंमत 15,000 युरो म्हणजे अंदाजे 16 लाख रुपये असू शकते. भारतातील किंमत अद्याप निश्चित झालेली नाही.
Ans: Citroen 2CV पहिल्यांदा 1948 मध्ये सादर करण्यात आली होती.






