फोटो सौजन्य: istock
भारताच्या ऑटो बाजारात नव्या GST 2.0 मुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे कॉम्पॅक्ट डिझेल SUV पूर्वीपेक्षा अधिक किफायतशीर झाल्या आहेत. किया (Kia), टाटा (Tata) आणि महिंद्रा (Mahindra)सारख्या कंपन्यांच्या लोकप्रिय मॉडेल्सवर आता लाखों रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे SUV खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा उत्तम काळ मानला जात आहे. अशातच जर तुम्ही सुद्धा नवीन एसयूव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर कोणत्या लोकप्रिय एसयूव्हीवर किती रुपयांची सूट मिळत आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
कॉम्पॅक्ट डिझेल SUV सेगमेंटमध्ये Kia Syros ही सर्वाधिक दरकपात मिळवणारी कार ठरली आहे. तिच्या HTX+ (O) AT व्हेरिएंटवर तब्बल 1.86 लाख रुपयांपर्यंत किंमतकपात झाली आहे. या कपातीमुळे Syros आता प्रीमियम अनुभव आणि दमदार इंजिनसह आणखी स्वस्त झाली आहे. लाँचनंतर विक्री अपेक्षेपेक्षा कमी राहिली होती; त्यामुळे ही दरकपात बाजारपेठेत तिचे स्थान मजबूत करण्यास मदत करू शकते.
स्टायलिश लूक आणि फीचर्समुळे लोकप्रिय असलेली Kia Sonet आता अधिक किफायतशीर झाली आहे. तिच्या GTX Plus AT डिझेल व्हेरिएंटची किंमत 1.64 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर Sonet सब-4 मीटर SUV सेगमेंटमधील एक उत्तम आणि परवडणारा पर्याय ठरत आहे.
महिंद्राची नवी SUV XUV 3XOही मोठ्या दरकपातीसह अधिक आकर्षक बनली आहे. याच्या AX7L डिझेल व्हेरिएंटवर तब्बल 1.56 लाख रुपयांची किंमतकपात झाली आहे. दमदार परफॉर्मन्स आणि मजबूत बांधणीमुळे आधीच लोकप्रिय असलेली ही SUV आता ग्राहकांसाठी आणखी परवडणारी झाली आहे.
Maruti Invicto क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास? BNCAP मध्ये किती मिळाले रेटिंग?
भारताची सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon आता अधिक स्वस्त मिळत आहे. याच्या Fearless Plus PS DK व्हेरिएंटवर 1.55 लाख रुपयांपर्यंत सूट दिली गेली आहे. सुरक्षितता आणि फीचर्ससाठी ओळखली जाणारी Nexon आता कमी किमतीमुळे अधिक डिमांडमध्ये येण्याची शक्यता आहे.
ऑफ-रोडिंगसाठी आवडती असलेली Mahindra Thar देखील आता ग्राहकांसाठी आणखी सहज उपलब्ध झाली आहे. तिच्या LX 2WD डिझेल व्हेरिएंटवर 1.35 लाख रुपयांचा टॅक्स कमी झाला आहे. यामुळे थार आता दमदार रोड प्रेझेन्स आणि साहसी ड्रायव्हिंगचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.