Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota Fortuner चे सुखाचे दिवस सरणार…! MG Majestor ‘या’ दिवशी भारतात धडाडणार

या आठवड्यात MG Majestor सादर होण्याच्या तयारीत आहे. ही दमदार एसयूव्ही थेट Toyota Fortuner सोबत स्पर्धा करणार आहे. चला या नवीन एसयूव्हीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • या आठवड्यात MG Motors ची नवीन एसयूव्ही येणार
  • MG Majestor असे या नवीन SUV चे नाव
  • जाणून घ्या या नवीन एसयूव्हीबद्दल
भारताच्या प्रमुख ऑटो कंपन्यांमध्ये MG Motors चा समावेश होतो. कंपनीकडून भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. आता एमजी मोटर्सकडून या आठवड्यात नवीन SUV म्हणून MG Majestor भारतीय बाजारात सादर केली जाणार आहे. लाँचपूर्वीच या SUV ने आपल्या सेगमेंटमधील इतर SUV साठी मोठे आव्हान निर्माण केले आहे. ही SUV कोणत्या खास फीचर्स आणि इंजिन पर्यायांसह येणार आहे, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

या आठवड्यात होणार MG Majestor ची एंट्री

एमजी मोटर्सकडून Majestor SUV या आठवड्यात भारतात सादर केली जाणार आहे. कंपनीकडून या SUV मध्ये अनेक प्रीमियम फीचर्ससोबत दमदार इंजिन देण्यात येणार आहे.

पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट! फेब्रुवारी 2026 मध्ये हजारो रुपये

लाँचपूर्वीच केला नवा विक्रम

लाँच होण्याआधीच या SUV ने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अलीकडेच MG Majestor ने नागालँडमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच डोंगर असलेल्या Mount Japfü वर यशस्वी चढाई केली आहे. अत्यंत अवघड आणि खडतर मार्गांसाठी ओळखल्या जाणाऱ्या माउंट जाफूला सहज पार करत या SUV ने आपली ताकद सिद्ध केली आहे.

कसे असू शकतात फीचर्स?

MG Motors कडून Majestor मध्ये अनेक अत्याधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये LED हेडलाइट्स, LED DRL, समोर मोठी ग्रिल, 20 इंच अलॉय व्हील्स, ड्युअल टोन एक्सटीरियर, 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल टोन इंटीरियर, टाइप-C USB चार्जिंग पोर्ट, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, तसेच ड्रायव्हिंगसाठी विविध मोड्स देण्यात येऊ शकतात.

प्रवाशांच्या सेफ्टीच्या दृष्टीने या SUV मध्ये सहा एअरबॅग्स, ABS, EBD, हिल असिस्ट, BSD, LCA, RCTA, DOW, सेल्फ-अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ADAS सारखी प्रगत सुरक्षा फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

किती दमदार असू शकते इंजिन?

कंपनीकडून अद्याप इंजिनबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, MG Majestor ही SUV पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांसह येण्याची शक्यता आहे. पेट्रोल इंजिनमधून सुमारे 184 किलोवॉट पॉवर आणि 410 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकतो. तर टर्बो डिझेल इंजिनमधून 160 किलोवॉट पॉवर आणि 500 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण होण्याची शक्यता आहे.

दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये 4X4 ड्राइव्ह सिस्टम दिली जाऊ शकते. पेट्रोल व्हेरिएंटची टॉप स्पीड 190 KMPH तर डिझेल व्हेरिएंटची टॉप स्पीड 175 KMPH पर्यंत असू शकते. यासोबतच 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येण्याची शक्यता आहे.

कधी होणार लाँच?

भारतात MG Majestor ही SUV अधिकृतपणे 12 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे. त्यानंतरच या SUV च्या किमतींची अचूक माहिती आपल्यासमोर समोर येईल. MG Majestor ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 40 ते 50 लाख रुपये दरम्यान असू शकते.

Web Title: Mg majestor will launch on 12 february 2026 compete with toyota fortuner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • automobile
  • Mg motors car
  • SUV
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

TVS ची ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर महागली! किमतीत तब्बल ४,००० रुपयांपर्यंत वाढ! पाहा काय आहे विषय
1

TVS ची ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर महागली! किमतीत तब्बल ४,००० रुपयांपर्यंत वाढ! पाहा काय आहे विषय

Hyundai: हुंदाईच्या गाड्यांवर ऑगस्टमध्ये रु. ८५,००० पर्यंतची सूट! १५ ऑगस्टपूर्वी बुकिंग केल्यास मिळणार एक्स्ट्रा फायदा!
2

Hyundai: हुंदाईच्या गाड्यांवर ऑगस्टमध्ये रु. ८५,००० पर्यंतची सूट! १५ ऑगस्टपूर्वी बुकिंग केल्यास मिळणार एक्स्ट्रा फायदा!

‘गोबरधन’ योजनेमुळे CNG कार्सचे भविष्य बदलणार! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २३,७३१ कोटी रुपयांची मोठी तरतूद!
3

‘गोबरधन’ योजनेमुळे CNG कार्सचे भविष्य बदलणार! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २३,७३१ कोटी रुपयांची मोठी तरतूद!

BMW X1 Launch : भारतात लाँचिंगपूर्वीच बीएमडब्ल्यू X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला सुरुवात! या’ दिवशी होणार ऑफीशल एंट्री!
4

BMW X1 Launch : भारतात लाँचिंगपूर्वीच बीएमडब्ल्यू X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला सुरुवात! या’ दिवशी होणार ऑफीशल एंट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.