
फोटो सौजन्य - Social Media
थंड हवेत गाडीचे ऑइल गाढ होते आणि प्रवाह कमी होत असल्याने इंजिनवर जास्त भार येऊ शकतो. त्यामुळे नियमितपणे ऑइल लेव्हल तपासा आणि जर ऑइल जुने झाले असेल तर सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बदलून घ्या. योग्य अशा विंटर-ग्रेड ऑइलचा वापर केल्यास मायलेज आणि स्मूद रनिंग यामध्ये लक्षणीय फरक जाणवतो. तिसरी काळजी म्हणजे टायर प्रेशर. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे टायरमधील हवा दाबही कमी होतो आणि टायरी घसरू शकतात. त्यामुळे दर आठवड्याला टायर प्रेशर तपासणे आवश्यक आहे. योग्य टायर प्रेशरमुळे ट्रॅक्शन चांगले मिळते आणि मायलेजही सुधारते. चौथी महत्त्वाची बाब म्हणजे बॅटरीची तपासणी.
हिवाळ्यात बॅटरीचा कार्यभाग मंदावतो, त्यामुळे सेल्फ-स्टार्ट गाड्या विशेष लक्ष देणे गरजेचे असते. टर्मिनल्स स्वच्छ ठेवणे आणि बॅटरी चार्ज व्यवस्थित आहे का हे तपासणे आवश्यक आहे. पाचवा मुद्दा म्हणजे एअर फिल्टरची सफाई. थंड हवेत धूळ कमी असली तरी ओलावा वाढतो, ज्यामुळे एअर फिल्टरमध्ये ओलसर धूल जमा होऊ शकते आणि एअर-फ्लो कमी होतो. एअर फिल्टर स्वच्छ असेल तर इंजिनला योग्य प्रमाणात हवा मिळते आणि मायलेजही लक्षणीय वाढते. सहावी काळजी म्हणजे इंधनाची गुणवत्ता. थंड हवेत निम्न दर्जाचे किंवा मिसळलेले इंधन वापरल्यास कार्ब्युरेटर/इंजेक्टरमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे विश्वसनीय पंपातूनच पेट्रोल भरावे.
सातवा मुद्दा म्हणजे चेन ल्युब्रिकेशन. हिवाळ्यात चेन सुकण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे चेनवर योग्य ल्युब लावत राहा. यामुळे गाडीचा पिकअप सुधारतो आणि मायलेजवरही चांगला परिणाम होतो. तसेच हिवाळ्यात लांब प्रवास करण्याआधी ब्रेक्सची तपासणी, लाइट्स योग्य आहेत का, कव्हरचा वापर, आणि गाडी धुक्यात ठेवण्याऐवजी कोरड्या जागेत पार्क करणे या अतिरिक्त गोष्टींची काळजी घेतल्यास बाईकचे आयुष्य वाढते. हिवाळ्यातील तापमान बदलामुळे वाहनाची कार्यक्षमता कमी होऊ शकते, मात्र या साध्या टिप्स अवलंबल्यास तुमची बाईक थंडीतही उत्तम मायलेज देईल, इंजिन स्मूद राहील आणि संपूर्ण हिवाळा कोणत्याही त्रासाशिवाय तुमची राइडिंग एन्जॉय करता येईल.