Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

हल्ली मार्केटमध्ये अनेक असे उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर पाहायला मिळतात. त्यातही अनेक जण सेकंड हॅन्ड इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यावर जास्त लक्षकेंद्रित करत असतात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 02, 2026 | 09:59 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात ई स्कूटरच्या मागणीत वाढ
  • सेकंड हॅन्ड ई स्कूटरला देखील मिळतोय ग्राहकांचा चांगला पाठिंबा
  • मात्र, स्कूटर खरेदी करण्याआधी समजून घ्या काही गोष्टी
पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि कमी चालू खर्चामुळे अनेक जण ईव्ही वाहनांकडे वळत आहेत. यामुळे भारतामध्ये Electric Scooter ची मागणी झपाट्याने वाढत आहे. आता बाजारात सेकंड-हँड म्हणजेच वापरलेले इलेक्ट्रिक स्कूटरही सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांसमोर प्रश्न निर्माण होतो की नवीन स्कूटर घ्यावे की जुने स्कूटर खरेदी करणे योग्य ठरेल.

योग्य तपासणी करून घेतल्यास सेकंड-हँड इलेक्ट्रिक स्कूटर घेणे चुकीचा निर्णय ठरत नाही. मात्र पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत ईव्हीमध्ये काही महत्त्वाचे इलेक्ट्रिक पार्ट्स असतात, ज्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. तपासणी न करता स्कूटर खरेदी केल्यास नंतर मोठा खर्च येऊ शकतो. त्यामुळे सेकंड-हँड इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच

बॅटरीची स्थिती तपासणे खूप महत्वाचे

इलेक्ट्रिक स्कूटरमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची बॅटरी. सर्वप्रथम बॅटरी योग्य प्रकारे चार्ज होते का, हे तपासा. पूर्ण चार्ज केल्यानंतर स्कूटर किती अंतर चालते याचा अंदाज घेणेही गरजेचे आहे. जर बॅटरी लवकर संपत असेल, तर तिची क्षमता कमी झाल्याचे संकेत असू शकतात. चार्जिंग पोर्ट आणि केबलमध्ये कट, गंज किंवा नुकसान झालेले नाही ना, हेही तपासा. कारण बॅटरी बदलणे हा खर्चिक पर्याय ठरू शकतो. शक्य असल्यास बॅटरीची वारंटी अद्याप लागू आहे का, याचीही माहिती घ्या.

मोटर आणि वायरिंग सिस्टम तपासा

बॅटरीनंतर मोटर हा स्कूटरमधील दुसरा महत्त्वाचा घटक आहे. स्कूटर खरेदी करण्यापूर्वी टेस्ट राइड जरूर घ्या. चालवताना मोटरमधून विचित्र आवाज येतो का, स्कूटर झटके देतो का किंवा स्पीड अचानक कमी-जास्त होतो का, याकडे लक्ष द्या. याशिवाय वायरिंग सिस्टम व्यवस्थित आहे का, हेही तपासा. स्कूटरच्या तळाशी किंवा मोटरजवळ पाण्याचे डाग असल्यास इलेक्ट्रिक पार्ट्स खराब होण्याची शक्यता असते. शक्य असल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिस हिस्ट्री तपासून घ्या, त्यामुळे स्कूटरची योग्य वेळी देखभाल झाली आहे का, हे समजू शकते.

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी

स्मार्ट फीचर्स आणि कागदपत्रांची खात्री करा

अनेक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट डिस्प्ले किंवा मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटी असते. त्यामुळे डिस्प्लेवर दिसणारे फॉल्ट अलर्ट, बॅटरी हेल्थ रिपोर्ट आणि इतर माहिती तपासणे आवश्यक आहे. यामुळे स्कूटरच्या अंतर्गत स्थितीबद्दल अंदाज येतो. तसेच टायर, ब्रेक पॅड आणि लाईट्सची स्थितीही पाहून घ्या, कारण हे भाग कालांतराने झिजतात.

शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्ससह सर्व कागदपत्रांची खात्री करा. स्कूटर खरेदी करताना तो खरा मालकच विकत आहे याची खात्री करणे गरजेचे आहे. योग्य कागदपत्रे असल्यास पुढे कोणतीही कायदेशीर अडचण येत नाही.

Web Title: Things to know before buying second hand e scooter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
1

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
2

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
3

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या
4

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.