Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच

इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील आघाडीच्या Greaves Electric Mobility (GEM) कंपनीने त्यांची Ampere Nexus ही इलेक्ट्रिक स्कूटर नेपाळमध्ये लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 02, 2026 | 09:30 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळच्या ऑटो बाजारात Greaves Electric Mobility चे पाऊल
  • इलेक्ट्रिक स्कूटर Ampere Nexus लाँच
  • जाणून घ्या फीचर्स
Greaves Electric Mobility (GEM) या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील कंपनीने आपला आंतरराष्ट्रीय विस्तार करत नेपाळच्या बाजारात प्रवेश केला आहे. कंपनीने हा विस्तार STC Auto Solution Private Limited यांच्या भागीदारीत केला असून, याअंतर्गत आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर Ampere Nexus नेपाळमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

Ampere Nexus ही भारतातील अशी पहिली इलेक्ट्रिक दुचाकी आहे, जिने दक्षिण भारतातील अवघड मानल्या जाणाऱ्या Kolli Hills येथील 70 हेअरपिन वळणांचा प्रवास पूर्ण करून Asia Book of Records मध्ये नोंद मिळवली आहे. त्यामुळे डोंगराळ आणि आव्हानात्मक रस्त्यांसाठी ही स्कूटर सक्षम मानली जाते.

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी

डोंगराळ रस्त्यांसाठी खास डिझाइन

नेपाळमधील उंचसखल रस्ते, तापमानातील बदल आणि वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन Ampere Nexus स्कूटर तयार करण्यात आली आहे. ही स्कूटर उतार-चढाव, खडबडीत रस्ते, उंचावरील हवामानातील बदल आणि शहरी वाहतुकीत सहज चालवता येईल, अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे.

यामध्ये LFP बॅटरी, मजबूत टॉर्क डिलिव्हरी आणि स्थिर राइड सेटअप देण्यात आले आहे. त्यामुळे चढावर सहज गाडी चढवणे, ट्रॅफिकमध्ये स्मूथ अ‍ॅक्सिलरेशन आणि विविध प्रकारच्या रस्त्यांवर चांगले नियंत्रण मिळते.

कंपनीच्या मते, या स्कूटरने 13,200 फूट उंचीवरील Shipki La Pass जिंकण्यासोबतच 3,900 फूट उंचीवरील Kolli Hills मार्गावरील 70 हेअरपिन वळणे पार केली आहेत. त्यामुळे कठीण भौगोलिक परिस्थितीतही तिची क्षमता सिद्ध झाली आहे.

Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स

आधुनिक फीचर्सची सुविधा

Ampere Nexus स्कूटरमध्ये 7 इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Nex.io तंत्रज्ञानासह फुल-स्क्रीन मॅप मिररिंग, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, पुढील वळणाचे अंतर आणि ETA यांसारख्या सुविधा मिळतात.

याशिवाय स्कूटरमध्ये कॉल कनेक्टिव्हिटी, रिअल-टाइम व्हेईकल मॉनिटरिंग आणि म्युझिक कंट्रोल यांसारखी कनेक्टेड फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच Ampere Connect Companion अ‍ॅपच्या मदतीने स्मार्ट पेअरिंग, वाहन ट्रॅकिंग, बॅटरी हेल्थ तपासणी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

स्वच्छ मोबिलिटीला चालना

या विस्ताराबाबत बोलताना कंपनीचे एमडी आणि सीएफओ Vikas Singh यांनी सांगितले की, नेपाळमध्ये डोंगराळ भूप्रदेश, जास्त वापर आणि वाढणारी ईव्ही पायाभूत सुविधा यामुळे मजबूत आणि टिकाऊ इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. Ampere Nexus ही स्कूटर त्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, ती नेपाळमधील स्वच्छ आणि शाश्वत मोबिलिटीला चालना देईल.

दरम्यान, कंपनी येत्या काळात नेपाळमधील इतर शहरांमध्येही आपला विस्तार करण्याची योजना आखत असून, इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वाढीसाठी दीर्घकालीन योगदान देण्याचा कंपनीचा मानस आहे.

Web Title: Greaves electric mobility electric scooter ampere nexus launched in nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

Bajaj Dominar की Triumph 400, कोणती बाईक तुम्हाला जास्त शोभेल? खरेदी करण्याआधी जाणून घ्या किंमत
1

Bajaj Dominar की Triumph 400, कोणती बाईक तुम्हाला जास्त शोभेल? खरेदी करण्याआधी जाणून घ्या किंमत

‘ही’ कंपनी एका झटक्यात 11 कार बंद करण्याच्या तयारीत? ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
2

‘ही’ कंपनी एका झटक्यात 11 कार बंद करण्याच्या तयारीत? ग्राहकांवर होणार मोठा परिणाम

फुल चार्जवर 926 किमीची रेंज! Mercedes-Benz च्या ‘या’ खास कारचा फेसलिफ्ट मॉडेल लाँच
3

फुल चार्जवर 926 किमीची रेंज! Mercedes-Benz च्या ‘या’ खास कारचा फेसलिफ्ट मॉडेल लाँच

मार्केट आम्हीच गाजवणार! अनेक ऍडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असेल Toyota Fortuner 2026, किंमत…
4

मार्केट आम्हीच गाजवणार! अनेक ऍडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असेल Toyota Fortuner 2026, किंमत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.