
हेल्मेट घालणं ओझं वाटतंय? 'या' ५ सोप्या टिप्स फॉलो करा (Photo Credit - X)
१. योग्य आकार आणि हलक्या वजनाचे हेल्मेट निवडा
हेल्मेटचा चुकीचा आकार ही त्रासाची सर्वात मोठी कारण आहे. खूप सैल हेल्मेट डोक्यावर हलत राहते, तर खूप घट्ट हेल्मेटमुळे डोकेदुखी होऊ शकते. खरेदी करताना नेहमी आपल्या डोक्याच्या मापाप्रमाणे आणि ISI मार्क असलेलेच हेल्मेट घ्या. वजनदार हेल्मेटमुळे मानेवर ताण येतो, त्यामुळे कार्बन फायबरसारख्या हलक्या पण मजबूत मटेरियलचे हेल्मेट निवडणे केव्हाही चांगले.
२. व्हेंटिलेशन आणि हवा खेळती राहण्याकडे लक्ष द्या
उन्हाळ्यात हेल्मेटच्या आत होणारा घाम आणि उष्णता सर्वात जास्त त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणजे असे हेल्मेट निवडा ज्यात हवेसाठी ‘वेंटिलेशन पोर्ट्स’ दिलेले असतील. योग्य एअरफ्लोमुळे डोके थंड राहते आणि घाम कमी येतो. लांबच्या प्रवासासाठी दर्जेदार व्हेंटिलेशन असलेले हेल्मेट थकवा कमी करण्यास मदत करते.
हे देखील वाचा: महिंद्रा XUV 7XO ची लॉन्च डेट जाहीर, ट्रिपल स्क्रीन आणि ADAS सह दमदार एन्ट्री
३. केस आणि टाळूची सुरक्षा अशी करा
हेल्मेटमुळे केस खराब होणे किंवा खाज येणे ही सामान्य समस्या आहे. यासाठी सोपा उपाय म्हणजे ‘बालकलावा’ (Balaclava) किंवा सुती रुमालाचा वापर. हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्यावर पातळ सुती कापड बांधल्यास घाम शोषला जातो. यामुळे केस आणि हेल्मेटमध्ये घर्षण होत नाही, केस तुटण्याचे प्रमाण कमी होते आणि हेल्मेट देखील आतून स्वच्छ राहते.
४. विझरच्या (Visor) गुणवत्तेकडे दुर्लक्ष करू नका
अंधूक किंवा स्क्रॅच पडलेल्या विझरमुळे नीट दिसत नाही, मग लोक विझर वर करून गाडी चालवतात. हे अत्यंत धोकादायक आहे. नेहमी स्वच्छ, स्क्रॅच-फ्री आणि अँटी-फॉग कोटिंग असलेला विझर वापरा. यामुळे पाऊस किंवा थंडीतही स्पष्ट दिसेल आणि डोळ्यांचे धुळीपासून संरक्षण होईल.
५. स्ट्रॅपची फिटिंग नीट ठेवा
अनेकजण हेल्मेट घालतात पण त्याची पट्टी (Strap) नीट लावत नाहीत. स्ट्रॅप इतकी घट्ट असावी की हेल्मेट पडणार नाही आणि इतकी सैल असावी की श्वास घेताना किंवा मान वळवताना त्रास होणार नाही. योग्य फिटिंगमुळे हेल्मेटचे वजन डोक्यावर समप्रमाणात विभागले जाते आणि ते वापरणे अधिक सोयीचे वाटते.
हे देखील वाचा: Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार