फोटो सौजन्य - Social Media
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या महिंद्रा XUV700 ची एक्स-शोरूम किंमत 14.13 लाख ते 23.71 लाख रुपये इतकी आहे. नव्या XUV 7XO च्या किमतीत मात्र थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, एंट्री-लेव्हल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत सध्याच्या MX पेट्रोल व्हेरिएंटच्या आसपासच ठेवली जाऊ शकते. तर टॉप-स्पेक AX7L 7-सीटर डिझेल ऑटोमॅटिक AWD व्हेरिएंट सध्याच्या मॉडेलपेक्षा किंचित महाग असू शकतो. सध्या या व्हेरिएंटची किंमत 23.57 लाख रुपये असून, नव्या फुली-लोडेड XUV 7XO व्हेरिएंटची किंमत सुमारे 25 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाऊ शकते.
फीचर्सच्या बाबतीत महिंद्रा XUV 7XO अनेक नवीन मानके प्रस्थापित करणार आहे. ही महिंद्राची पहिली SUV असेल, ज्यामध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप देण्यात येणार आहे. यामध्ये सेंट्रल टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि समोर बसलेल्या प्रवाशासाठी स्वतंत्र डिस्प्लेचा समावेश असेल. याशिवाय, SUV मध्ये प्रीमियम हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, ऑटो-डिमिंग IRVM, मागील प्रवाशांसाठी BYOD (Bring Your Own Device) एंटरटेनमेंट सपोर्ट, पॅनोरमिक सनरूफ आणि इलेक्ट्रिक बॉस मोडसारखे लक्झरी फीचर्स मिळणार आहेत.
सेफ्टीच्या दृष्टीनेही XUV 7XO अधिक सक्षम करण्यात आली आहे. या SUV मध्ये अपडेटेड लेव्हल-2 ADAS पॅकेज, कस्टमायजेबल एंबियंट लाइटिंगसह अनेक प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात येणार असल्याने, ती मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये अधिक मजबूत पर्याय ठरणार आहे.
डिझाइनच्या बाबतीत XUV 7XO चा लूक बराचसा XEV 9e वर आधारित असेल. यात नवीन फ्रंट ग्रिल, ट्रॅपेजॉइडल आकाराच्या LED हेडलाईट्स, बूमरँग स्टाइल DRLs आणि हेक्सागोनल डिझाइन एलिमेंट्ससह अपडेटेड टेललॅम्प्स पाहायला मिळतील. याशिवाय, नव्या डिझाइनचे एअरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स, फुल-विथ कनेक्टेड लाइट बार आणि रिव्हाइज्ड रिअर बंपरही या फेसलिफ्टमध्ये देण्यात येणार आहेत.
मेकॅनिकल बाबतीत मात्र XUV 7XO मध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. यात आधीप्रमाणेच 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, जे 200bhp पॉवर निर्माण करते. तसेच 2.2 लीटर डिझेल इंजिन 155bhp आणि 185bhp अशा दोन ट्यूनमध्ये उपलब्ध असेल. AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) सिस्टम फक्त डिझेल व्हेरिएंटमध्येच दिली जाणार आहे. एकंदरीत, आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक फीचर्स आणि प्रगत सेफ्टी टेक्नॉलॉजीच्या जोरावर महिंद्रा XUV 7XO मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये मोठी छाप पाडण्याची शक्यता आहे.






