
1973 च्या ऐतिहासिक बाइकपासून प्रेरणा
डुकाटी फॉर्म्युला 73 ही कंपनीच्या 1973 मधील 750 सुपर स्पोर्ट डेस्मो या ऐतिहासिक बाइकला समर्पित आहे. 1972 मध्ये इमोला येथे झालेल्या 200 मिग्लिया शर्यतीत डुकाटीने मिळवलेल्या विजयातून या बाइकची प्रेरणा मिळाली आहे. सिल्व्हर आणि एक्वा-ग्रीन रंगसंगती, गोल्डन स्ट्राइप, क्लिप-ऑन हँडलबार, बार-एंड मिरर आणि छोटेखानी फेअरिंग यामुळे तिला खास रेट्रो लूक मिळतो. प्रत्येक बाइकवर स्वतंत्र सीरियल नंबर असेल. सोबत ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट, ऐतिहासिक फोटो आणि डिझाइन स्केचेसही दिले जातील.
803 cc इंजिन आणि दमदार परफॉर्मन्स
या मोटरसायकलमध्ये 803 cc क्षमतेचे एअर-कूल्ड, L-ट्विन डेस्मोड्यू इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,250 rpm वर 73 hp पॉवर आणि 7,000 rpm वर 65.2 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनमध्ये डेस्मोड्रोमिक व्हॉल्व्ह टेक्नोलॉजी असून, राइड-बाय-वायर थ्रॉटल सिस्टिमही मिळते. टर्मिग्नोनीने विकसित केलेली एक्झॉस्ट सिस्टिम तिच्या स्पोर्टी व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे.
कावासाकी Z1100 भारतात लाँच! 134 bhp पॉवर, 1099cc इंजिन अन् प्रीमियम फीचर्स; किंमत 12.79 लाख रुपये
प्रीमियम हार्डवेअर आणि आधुनिक सेफ्टी
बाइकमध्ये स्टील ट्रेलिस फ्रेम, 41 mm KYB अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क आणि मागच्या बाजूला प्रीलोड-अॅडजस्टेबल सस्पेन्शन आहे. ब्रेकिंगसाठी 330 mm फ्रंट डिस्क आणि ब्रेम्बोचे 4-पिस्टन कॅलिपर मिळतात. 17-इंच स्पोक व्हील्सवर पिरेली डियाब्लो रोसो IV टायर्स देण्यात आले आहेत. फ्युएलशिवाय बाइकचे वजन 183 kg आहे.
कॉर्नरिंग ABS, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, क्विक शिफ्ट आणि स्पोर्ट व रोड राइडिंग मोड्स ही तिची प्रमुख फीचर्स आहेत. याशिवाय 4.3-इंच TFT डिस्प्ले आणि फुल-LED लाइटिंग मिळते. डुकाटीच्या शंभराव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचा भाग असलेली ही लिमिटेड एडिशन बाइक आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या युनिट्सच्या बाबतीत पूर्णपणे सोल्ड आउट झाली आहे.
बजाज पल्सर N250SS लाँच! 1.59 लाख रुपये किंमत, TFT डिस्प्ले, 6-स्पीड गिअरबॉक्ससह मिळणार दमदार फीचर्स
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: डुकाटी फॉर्म्युला 73 ची भारतातील किंमत किती आहे?
उत्तर: डुकाटी फॉर्म्युला 73 ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 20 लाख रुपये आहे.
प्रश्न 2: डुकाटी फॉर्म्युला 73 मध्ये कोणते इंजिन मिळते?
उत्तर: या बाइकला 803 cc एअर-कूल्ड L-ट्विन डेस्मोड्यू इंजिन मिळते. ते 73 hp पॉवर आणि 65.2 Nm टॉर्क जनरेट करते.
प्रश्न 3: डुकाटी फॉर्म्युला 73 भारतात खरेदी करता येईल का?
उत्तर: सध्या भारतासाठी निश्चित केलेला स्टॉक विकला गेला आहे आणि बुकिंग बंद आहे. त्यामुळे नवीन युनिट्स उपलब्ध होतील की नाही, याबाबत कंपनीच्या पुढील घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल.