Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E20 इंधनामुळे इंजिन सुरक्षित; 60 हजार किमी चाचण्यांत यशस्वी ठरली वाहने

वाहनधारकांनी कंपनीच्या शिफारशीनुसार नियमित सर्व्हिसिंग अधिकृत सेवा केंद्रातून करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. भारताच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाला चालना देण्यासाठी वाहन उद्योग पूर्णपणे सज्ज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2026 | 02:15 PM
E20 इंधनामुळे इंजिन सुरक्षित; 60 हजार किमी चाचण्यांत यशस्वी ठरली वाहने

E20 इंधनामुळे इंजिन सुरक्षित; 60 हजार किमी चाचण्यांत यशस्वी ठरली वाहने

Follow Us
Follow Us:

पुणे : E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) इंधनामुळे वाहनांच्या इंजिनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नसून, 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंतच्या व्यापक चाचण्यांमध्ये इंजिनची दीर्घकालीन कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध झाली आहे, अशी माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)चे संचालक यांनी दिली.

कोथरूड येथील एआरएआयच्या मुख्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत E20 इंधनाशी संबंधित ग्राहकांच्या शंका, वाहनांची टिकाऊ क्षमता आणि इंधन कार्यक्षमतेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. E20 सुसंगत प्रत्येक वाहन बाजारात आणण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय निकष आणि मूळ उपकरण उत्पादकांच्या (ओईएम) मानकांनुसार कठोर प्रमाणीकरण व पडताळणी प्रक्रियेतून जात असल्याचे डॉ. मथाई यांनी स्पष्ट केले.

भारतात फॅन्सी हॉर्नवर बंदी का आहे? जाणून घ्या RTO चे नियम आणि दंडाची रक्कम

त्यांनी सांगितले की, विविध हवामान, रस्ते आणि वापराच्या परिस्थितींमध्ये वाहनांची प्रत्यक्ष तसेच प्रयोगशाळेत कसून चाचणी केली जाते. या प्रक्रियेत इंजिन, इंधन प्रणाली, इंधनवाहिन्या आणि इतर महत्त्वाच्या घटकांवर इथेनॉल मिश्रणाचा परिणाम तपासला जातो. या सर्व चाचण्यांमध्ये वाहनांची कामगिरी समाधानकारक आढळली असून इंजिनच्या दीर्घकालीन आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नसल्याची पुष्टी झाली आहे.

प्रमाणित प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये E20 इंधनामुळे इंधन कार्यक्षमतेत केवळ 2 ते 6 टक्क्यांपर्यंतच घट आढळून आली आहे. मात्र प्रत्यक्ष वापरातील इंधनाचा खर्च वाहन चालविण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि वाहनाची देखभाल यांसारख्या घटकांवर अवलंबून असतो, असेही त्यांनी नमूद केले.

वाहनधारकांनी कंपनीच्या शिफारशीनुसार नियमित सर्व्हिसिंग अधिकृत सेवा केंद्रातून करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. भारताच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाला चालना देण्यासाठी वाहन उद्योग पूर्णपणे सज्ज असून, ग्राहकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार E20 सुसंगत वाहने उपलब्ध करून देण्यास उद्योग कटिबद्ध असल्याचे एआरएआयने स्पष्ट केले.

Web Title: Engine safe with e20 fuel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.