EV Battery Life: भारतीय ऑटोमोबाइल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (EVs) मागणी वेगाने वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि सरकारच्या सबसिडीमुळे लोक EV कडे आकर्षित होत आहेत. मात्र, EV खरेदी करणाऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो की, या वाहनांची बॅटरी किती वर्षे टिकते आणि खराब झाल्यावर तिचे काय केले जाते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण कोणत्याही EV च्या एकूण किमतीपैकी सुमारे ४० टक्के खर्च फक्त बॅटरीवर होतो.
बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला जातो. या बॅटरीचे आयुष्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. साधारणपणे एक EV बॅटरी ६ ते ८ वर्षे सहज चालू शकते, तर काही प्रीमियम वाहनांच्या बॅटरी १० वर्षांपर्यंत टिकू शकतात. अनेक कंपन्या बॅटरीवर ७ ते ८ वर्षांची वॉरंटी देतात. याचा अर्थ, या काळात बॅटरीची क्षमता किमान ७०-८० टक्के कायम राहते.
EV बॅटरी कालांतराने आपली चार्जिंग क्षमता गमावते, याला बॅटरी डिग्रेडेशन म्हणतात. पहिल्या २-३ वर्षांत बॅटरी स्थिर राहते, पण त्यानंतर दरवर्षी तिची क्षमता २-३ टक्क्यांनी कमी होऊ शकते. सुमारे ८ वर्षांनंतर बॅटरीची क्षमता ७० टक्क्यांपर्यंत खाली येते. उदाहरणार्थ, जर नवीन EV एकदा चार्ज केल्यावर ४०० किमीची रेंज देत असेल, तर ८ वर्षांनंतर तीच गाडी फक्त २८०-३०० किमीची रेंज देईल.
फेस्टिव्हल सीझनमध्ये ५ नवीन SUV आणि Sedan दाखल होणार; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
बॅटरीचे आयुष्य संपल्यानंतरही ती पूर्णपणे निरुपयोगी होत नाही. तिचा अनेक ठिकाणी पुनर्वापर केला जातो:
सरकार आणि उद्योगाची भूमिका भारत सरकारने EV बॅटरीच्या ‘सेकंड-लाइफ’ आणि रीसायकलिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अनेक स्टार्टअप आणि कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. येत्या काळात बॅटरी रीसायकलिंग एक मोठा उद्योग बनेल, ज्यामुळे ई-कचऱ्याची समस्या कमी होईल आणि नवीन बॅटरीचा खर्चही कमी होईल.