Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

4 वर्षांनंतर धमाकेदार ऑफर, Maruti, Hyundai आणि Mahindra च्या अनेक मॉडेल्सवर सूट

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या हॅचबॅक आणि सेडान कारवर ही सूट उपलब्ध करण्यात आली आहे. या सवलतीची श्रेणी 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत आहे, तर काही कारवर ही सूट 40,000 ते 65,000 रुपयांपर्यंत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 02, 2024 | 10:36 AM
4 वर्षांनंतर धमाकेदार ऑफर, Maruti, Hyundai आणि Mahindra च्या अनेक मॉडेल्सवर सूट
Follow Us
Close
Follow Us:

या वर्षी जानेवारीपासून देशातील सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांनी कारच्या किमती वाढवल्या होत्या. पण, आता ते कारवर भरघोस सूट देणार आहेत. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण, 4 वर्षांनंतर कार्सवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. या सवलतीची श्रेणी 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत आहे, तर काही कारवर ही सूट 40,000 ते 65,000 रुपयांपर्यंत देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज सवलत समाविष्ट असणार आहे. TOI रिपोर्टमध्ये फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या हॅचबॅक आणि सेडान कारवर ही सूट उपलब्ध असून, ही कार ऑफर मारुतीपासून महिंद्रा, टाटा आणि ह्युंदाईपर्यंत अश्या गाड्यांवर धमाकेदार सूट दिली जाणार आहे.

या गाड्यांवर बंपर डिस्काउंट
FADA डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार, हॅचबॅक आणि सेडान कारवर काही उत्तम ऑफर्स उपलब्ध केली आहेत. Maruti Suzuki Alto K10 वर Rs 42,000 पर्यंत सूट मिळत आहे. तर, मारुती सुझुकी वॅगनआरवर ही सूट 25,000 ते 30,000 रुपये आहे. Hyundai Grand i10 Nios ची श्रेणी रु. 18,000 ते रु. 35,000 आहे. या गाड्यांवर ही ऑफर सुरु असून ही संधी तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे.

– मारुती सुझुकी सेलेरियोवर 41,000 रुपये, मारुती इग्निसवर 41,000 रुपये, बलेनोवर 36,000 रुपये, मारुती एस-प्रेसोवर 38,000 रुपये सूट देण्यात आली आहे.

– याचदरम्यान ही सूट, महिंद्राच्या बोलेरो निओवर 82,000 रुपये, बोलेरोवर 54,000 रुपये, टाटा नेक्सॉनवर 56,000 रुपये आणि टाटा टियागोवर 35,000 रुपयांपर्यंत सूट करण्यात आली आहे.

– याशिवाय ही सूट सेडान कारवार सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. या कारमध्ये, Hyundai Aura वर 23,000 ते 40,000 रुपयांपर्यंत, तर Honda Amaze वर 40,000 रुपयांपर्यंत सूट आहे. तथापि, या सवलतीमध्ये एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सूट देखील समाविष्ट केल्या आहेत.

– महागड्या इलेक्ट्रिक आणि एसयूव्ही वाहनांवरही ही सवलत आहे. यापैकी Hyundai Alcazar वर 45,000 ते 65,000 रुपयांची सूट मिळत आहे, तर Mahindra XUV400 EV वर 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

ही सूट का देण्यात येत आहे

प्रसिद्ध कंपन्यांच्या हॅचबॅक आणि सेडान कारवर या भरघोस सूटमागे एक खास कारण आहे. ऑटो डीलर्सचे म्हणणे आहे की या सवलतीचे मुख्य कारण त्यांच्याकडे असलेल्या कारची वाढती यादी हे असल्यामुळे ही सवलत देण्यात आली आहे. FADA चे अध्यक्ष, मनीष राज सिंघानिया म्हणाले की, जून आणि जुलै हे महिने संथ आहेत, त्यामुळे मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. तर तुम्ही जून आणि जुलै या महिन्यात नवीन कार विकत घेणार असाल तर ही मिळालेली संधी सोडू नका आणि आताच जवळच्या कारशोरूम मध्ये जाऊन या कार खरेदी करा.

Web Title: Explosive offer after 4 years discounts on many models of maruti hyundai and mahindra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 10:36 AM

Topics:  

  • auto news
  • Mahindra And Mahindra

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
2

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
3

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!
4

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.