फोटो सौजन्य: Freepik
आजकाल कार जुन्या व्हायला लागल्या की अनेक खराबी त्यात दिसून येतात. यातीलच एक प्रॉब्लेम म्हणजे कारच्या फ्युएल टॅंक मध्ये कचरा साचणे. जर तुम्ही तुमची नवीन कार नीट मेंटेन करत नसाल तर हा प्रॉब्लेम नवीन कारमध्ये सुद्धा येऊ शकतो. फ्युएल टॅंक मध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे तुमच्या कारच्या परफॉर्मन्सवर वाईट परिणाम होऊ शकतो. जर या समस्यांचे निदान वेळीच केले नाही तर यांमुळे अनेक पुढील समस्या होऊ शकतात.
फ्युएल टॅंकमधील घाण फ्युएल फिल्टरचे कार्य रोखू शकते, ज्यामुळे कार्ल इंधन पुरवठा कमी होतो. हे इंजिनची कार्यक्षमता कमी तर करतेच पब त्याव्यतिरिक्त कारच्या पॉवर आणि मायलेजवर परिणाम सुद्धा करू शकते. यामुळेच फ्युएल फिल्टर नियमितपणे तपासणे आणि बदलणे गरजेचे आहे.
फ्युएल टॅंकमधील घाणीमुळे फ्युएल पंप किंवा इनटेक पाईप्समध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे इंजिन स्टार्ट करण्यात समस्या होतात. यामुळे इंजिनच्या लाईफवर सुद्धा परिणाम होतो. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या कारमधील फ्युएल टॅंक आणि पंप नियमितपणे स्वच्छ ठेवा.
हे देखील वाचा: पॉवर पेट्रोल की नॉर्मल पेट्रोल, आपल्या वाहनांसाठी काय आहे योग्य?
फ्युएल टॅंक मधील घाण जर थंड हवामानात जमत असेल तर ती कारमधील इंधनाच्या प्रवाहावर परिणाम करू शकते, ज्यामुळे इंजिन थंड होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे हिवाळ्यात कारकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून, फ्युएल स्टॅबिलायझर वापरणे गरजेचे आहे.
धुळीमुळे फ्युएल टाकी आणि संबंधित भागांवर दबाव वाढू शकतो, ज्यामुळे इंधन गळतीची समस्या उद्भवू शकते. जर तुमच्या कारमध्ये सुद्धा इंधन गळती होत असेल तर, त्याची तात्काळ दुरुस्ती करा. तसेच आपल्या कारची नियमितपणे सर्व्हिसिंग करा.
फ्युएल फिल्टर बदला: टाकीमधून घाण इंजिनपर्यंत पोहोचू नये म्हणून फ्युएल फिल्टर नियमितपणे तपासा. तसेच वेळप्रसंगी ते बदला.
फ्युएल एडिटिव्स वापरा: चांगले फ्युएल एडिटिव्स वापरा जे फ्युएल सिस्टिमला स्वच्छ करण्यात मदत करेल.
सर्व्हिसिंगची करा: कारची नियमित सर्व्हिसिंग करा, जेणेकरून तुमच्या कारची लाईफ अजून वाढेल.
जर तुम्हाला असे वाटत असेल की फ्युएल टाकीमध्ये घाण जमा झाली आहे, तर ती एखाद्या मेकॅनिककडून साफ करून घ्यावी. तसेच उच्च दर्जाचे इंधन वापरावे जेणेकरून तुमच्या कारच्या फ्युएल टॅन्कमध्ये कचरा जमा होणार नाही.