फोटो सौजन्य: Freepik
आपण सर्वेच आठवड्यातून एकदा पेट्रोल भरण्यास जात असतो. अशावेळी आपण आपल्या पॉवर पेट्रोल आणि नॉर्मल पेट्रोल असे दोन पर्याय मिळतात. पॉवर पेट्रोल थोडे महाग असल्याकारणाने अनेकांना असे वाटते की हे खूप चांगले पेट्रोल आहे. पण नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमध्ये सुद्धा फरक आहे. जे जाणून तुम्ही ठरवू शकता की आपल्या वाहनाला पॉवर पेट्रोल ची गरज आहे की नॉर्मल पेट्रोलची.
ऑक्टेन रेटिंगचा आहे फरक
पॉवर पेट्रोल आणि नॉर्मल पेट्रोलमधील सर्वात मोठा फरक त्यांच्या ऑक्टेन रेटिंगमध्ये असतो. पॉवर पेट्रोलचे ऑक्टेन रेटिंग जास्त असते, ज्यामुळे हे पेट्रोल इंजिनमधील इंजिन नॉकिंग आणि डिटोनेटिंग कमी करण्यास मदत करते. याशिवाय, इंजिनमधून येणारा आवाजही कमी होतो. अधिक ऑक्टेनसह, वाहनाचे इंजिन देखील चांगले कार्य करते.
नॉर्मल पेट्रोलला कमी ऑक्टेन रेटिंग असते. साधारणपणे त्याचे ऑक्टेन रेटिंग सुमारे 87 असते. हे जुन्या वाहनांसाठी किंवा कमी कार्यक्षमता असलेल्या वाहनांसाठी योग्य पेट्रोल आहे.
पॉवर पेट्रोलचे ऑक्टेन रेटिंग जास्त आहे. साधारणपणे त्याचे ऑक्टेन रेटिंग 91 किंवा अधिक असते. जबरदस्त कार्यक्षमता असलेल्या वाहनांसाठी हे चांगले आहे कारण ते इंजिनला अधिक शक्ती देते आणि इंधन कार्यक्षमता वाढवते.
पॉवर पेट्रोलचे अनेक फायदे
पॉवर पेट्रोलमुळे इंजिनला जास्त पॉवर मिळते, ज्यामुळे गाडी जास्त वेगात तर चालतेच पण तिला एक्सीलरेशन सुद्धा चांगले मिळते. या पट्रोलमध्ये ऑक्टेन रेटिंग जास्त असल्यामुळे इंजिन जास्त कुशलतेने इंजिनचा वापर करते, ज्यामुळे मायलेज सुद्धा वाढतो. पॉवर पेट्रोलमुळे प्रदूषण सुद्धा कमी होते ज्यामुळे पर्यावरण चांगले राहते.