फोटो सौजन्य: Freepik
सध्या देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा चांगलाच दबदबा आहे. तसेच अनेक कंपनीज देखील इलेकट्रीक वाहनांच्या उत्पादनावर चांगलेच लक्ष केंद्रित करत आहे. वाढत्या पेट्रोल, सीएनजी, आणि डिझेलच्या किंमती बघता अनेक कार खरेदीदार आता इलेक्ट्रिक कार्सकडे आपला मोर्चा वळवत आहे.
इलेक्ट्रिक वाहनं फक्त येणारं भविष्य नसून पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे. यामुळेच सरकार सुद्धा नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनं घेण्यास प्रोत्साहित करत असते. जर तुम्ही सुद्धा इलेक्टिक वाहन घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने पीएम ई-ड्राइव्ह योजना सुरू केली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही पीएम ई-ड्राइव्ह ही योजना राबवली आहे. या योजनेचे बजेट 10,900 कोटी रुपये आहे. या योजनेत तुम्ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर, थ्री व्हीलर, ऍम्ब्युलन्स, ट्रक खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सबसिडी सुद्धा मिळेल. ही योजना दोन वर्षासाठी लागू कारणात आली असून,31 मार्च 2026 ही शेवटची तारीख असेल.
हे देखील वाचा: उन्हाळयात रस्त्यावर पाणी दिसण्याचा भास झाला आहे का? जाणून घ्या या मागचे कारण
महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक अनिश शाह म्हणाले की, सर्व विभागांसाठी जलद चार्जिंग पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक इलेक्ट्रिक वाहनांचा जलद अवलंब करण्यासाठी ग्राहकांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल. शाह पुढे म्हणाले की, पीएम ई-ड्राइव्हसह, 2030 पर्यंत 100 टक्के विद्युतीकरण साध्य करणारा भारत हा या विभागातील पहिला देश होताना दिसत आहे.
टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने राष्ट्र उभारणीच्या या प्रयत्नात आम्ही सरकार आणि इतर भागधारकांसोबत सहकार्य करत राहू.
ऑनलाइन कॅब बुकिंग सेवा पुरवणाऱ्या ओला कंपनीचे संस्थापक भावीश अग्रवाल म्हणाले की, ही योजना देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत पाऊल आहे.
NHEV (नॅशनल हायवेज फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स) चे कार्यक्रम संचालक अभिजित सिन्हा म्हणाले की, ई-ट्रकचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पीएम ई-ड्राइव्हमध्ये दिलेली 500 कोटींची रक्कम ई-ट्रकसाठी 3 दिवसांपूर्वी जारी करण्यात आली होती. 500 कोटी रुपयांच्या मिश्रित हवामान वित्तपुरवठा साधनासह, त्यांच्या तांत्रिक चाचण्या चेन्नईमध्ये सुरू होत आहेत.