फोटो सौजन्य: Social Media
सध्या ऊन आणि पावसाचा खेळ आपल्याला रोज पाहायला मिळतो. लवकरच ऑक्टोबर हीट सुद्धा होणार असल्याने अनेकांना आता घाम फुटू लागला आहे. आज हिवाळा, पावसाळा किंवा उन्हाळा असो, एसी आज प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळतो. ग्लोबल वॉर्मिग सुद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याने उकाडा अजूनच वाढत आहे. अशावेळी काही जणांना बरे नाही वाटत तर काही जण बाहेरच नाही पडत. पण उन्हाळ्यात किती तरी लोकांना रस्त्यावर पाणी नसलं तर ते असल्याचा भास होत असतो.
उन्हाळ्याच्या ऋतूत कडक उन्हात फिरत असताना, कधी कधी रस्त्याकडे पाहिल्यावर काही अंतरावर पाणी असल्याचे जाणवते. वाळवंटातही असेच काहीसे घडते, पण प्रत्यक्षात ते पाणी नसून आपला भ्रम आहे. रस्त्यावर किंवा वाळवंटात असे पाणी पाहण्याच्या भ्रमाला मृगजळ म्हणतात. चला जाणून घेऊया, तुम्हाला मृगजळ दिसण्याचे कारण काय आहे आणि ते का होते?
जेव्हा प्रकाश वेगवेगळ्या तापमानाच्या हवेच्या थरांमधून जातो तेव्हा मृगजळ तयार होते. या दरम्यान, प्रकाशाची किरणे वाकलेली असतात आणि हवेतून ये परावर्तित होतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ते जमिनीचे तापमान आणि त्यावरील तापमान क्षेत्रामुळे तयार होते. यामुळे उन्हाळ्यात रस्त्यावर पाण्याचे मृगजळ पाहायला मिळते.
मृगजळ अनेकदा वाळवंट, रस्ते आणि शेतात दिसते. या व्यतिरिक्त, कधीकधी आपण मैदानी भागात देखील याबद्दल गोंधळात पडू शकता. इटलीमध्ये फाटा मोर्गाना नावाचे मृगजळ खूप प्रसिद्ध आहे.
मृगमारीचिका हा शब्द राजस्थानातून आला आहे. तिथे खूप वाळवंट आहे, त्यामुळे जेव्हा वाळवंटाच्या उष्णतेमध्ये हरणांना तहान लागते, तेव्हा सूर्यप्रकाशामुळे ती चमकणारी वाळू हरणाला पाण्यासारखी दिसते. जेव्हा तो त्याच्या जवळ जातो आणि त्याला पाणी मिळत नाही. त्याचबरोबर हरणाला संस्कृतमध्ये मृगा आणि भ्रमाला मरीचिका म्हणतात. अशा प्रकारे मृगमरिचिका या शब्दाची उत्पत्ती झाली.