Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत फटाक्यांमुळे कारचे नुकसान झाल्यास ‘असा’ मिळवा इंश्युरन्स क्लेम

दिवाळीत अनेक जण फटाके फोडताना दिसतात. काही वेळेस या फटाक्यांमुळे कारचे मोठे नुकसान होते. अशावेळी तुम्ही इंश्युरन्स कंपनीकडून क्लेम कसा मिळवू शकता याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2024 | 09:21 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी भारतात खूप धुमधडाक्यात साजरा केली जाते. या शुभ काळात अनेक जण आपल्या नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना भेटत असतात, त्यांच्यासाठी मिठाई आणि भेटवस्तू घेऊन जात असतात. दिवाळीच्या सणात अनेक जण फटाके सुद्धा फोडताना दिसतात.

फक्त दिवाळीच्या सणातच नव्हे तर इतर कुठल्याही वेळी फटाके फोडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. अनेक वेळा दिवाळीत फाकटक्यांमुळे कार्सचे मोठे नुकसान पाहायला मिळते. हे नुकसान झाल्यानंतर कारचा इंश्युरन्स क्लेम का करावा हा मोठा प्रश्न कार मालकाच्या मनात येतो. जर तुमची सुद्धा कार फटाक्यांमुळे खराब झाली असेल आणि तुम्ही आता इंश्युरन्स क्लेम कसा मिळवा याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच लिहिली आहे.

हे देखील वाचा: अखेर वेळ आलीच! Maruti ची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार करणार ‘या’ देशात ग्लोबल डेब्यू

जर तुमची कार फटाक्यांमुळे खराब झाली असेल, तर ती कॉम्प्रेहेन्सिव्ह किंवा स्टॅन्डअलोन इंश्युरन्स अंतर्गत कव्हर केली जाते. याचे कारण म्हणजे आग किंवा स्फोटामुळे खराब झालेली कार या दोन्ही इंश्युरन्समध्ये समाविष्ट आहे. पण हे तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या कारचा इंश्युरन्स घेतला असेल. त्यानंतरच तुम्ही इंश्युरन्स कंपनीकडे पैसे मागू शकता.

लक्षात ठेवा

क्लेम करण्यापूर्वी तुम्ही तुमची इंश्युरन्स पॉलिसी काळजीपूर्वक वाचली पाहिजे. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नुकसानासाठी पैसे मिळतील आणि कोणती कागदपत्रे द्यावी लागतील, हे त्यात लिहिलेले असते.

फटाक्यांमुळे तुमची कार खराब झाल्यास प्रथम काय करावे

समजा तुमची कार खराब झाली तर तुम्ही प्रथम काय करावे? तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स कंपनीला किंवा तुमच्या इन्शुरन्स एजंटला ताबडतोब सांगावे. असे केल्याने तुम्हाला लवकर मदत होऊ शकते. तुमची समस्या एजंटला सांगितल्याने तो तुमच्यासाठी शक्य तितक्या लवकर सर्व व्यवस्था करेल.

जर तुमची कार खराब झाली तर पोलिसांकडे जा आणि एफआयआर दाखल करा. याद्वारे, विमा कंपनीला तुमच्या कारच्या नुकसानीची योग्य माहिती मिळेल आणि तुम्हाला विम्याचे पैसे लवकर मिळू शकतात.

कार इन्शुरन्स क्लेम कसा मिळवावा

जेव्हा तुम्ही विमा कंपनीकडे क्लेम करता तेव्हा कंपनी तुमचा क्लेम योग्य आहे की नाही हे तपासते. या तपासणीसाठी कंपनी एक इन्स्पेक्टर पाठवेल जो अपघात कसा झाला आणि तुमचा क्लेम खरा आहे की नाही हे नीट तपासून पाहील. तुमचा क्लेम योग्य असल्यास, विमा एजंट डॉक्युमेंटेशनचे काम सुरू करेल. सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर, विमा कंपनी तुम्हाला कार दुरुस्त करण्यासाठी पैसे देईल.

क्लेम केव्हा होतो रिजेक्ट

जर तुमच्या कारला आग लागली आणि ती कारच्या बॅटरीमधून स्पार्क झाल्यामुळे किंवा इलेक्ट्रिकल वायरिंगमधील बिघाडामुळे झाली असेल तर तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, जर तुमच्या कारमधील एसी किंवा सीएनजी गॅस किट बदलताना किंवा सेट करताना एखादी चूक झाली ज्यामुळे आग लागली, तर विमा कंपनी तुमचा क्लेम स्वीकारण्यास नकार देऊ शकते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, कार जर तुमच्या किंवा मेकॅनिकच्या चुकीमुळे झाली असेल तर विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही.

Web Title: Gow to get insurance claim in case of car damage due to firecrackers during diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 09:21 PM

Topics:  

  • Insurance Claim

संबंधित बातम्या

इंटरनॅशनल ट्रिपचे प्लॅनिंग करताय का? Travel Insurance ठरेल तुमचा साथीदार, कसे कराल अप्लाय
1

इंटरनॅशनल ट्रिपचे प्लॅनिंग करताय का? Travel Insurance ठरेल तुमचा साथीदार, कसे कराल अप्लाय

बँक बुडाली तरी चिंता नाही! खातेधारकांना मिळणार १० लाखांपर्यंतचा विमा
2

बँक बुडाली तरी चिंता नाही! खातेधारकांना मिळणार १० लाखांपर्यंतचा विमा

विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; बापाला मिळाली लेकाची साथ
3

विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; बापाला मिळाली लेकाची साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.