केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या जीएसटी कपातीमुळे ऑटो क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नवीन जीएसटी स्लॅबला मंजुरी दिली असून, हे नवे बदल २२ सप्टेंबरपासून लागू होतील. त्यानुसार, अनेक मोटरसायकलवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे बाईक आणि स्कूटरच्या किमती थेट कमी होणार आहेत.
देशात सर्वाधिक पसंतीची आणि विकली जाणारी मोटरसायकल म्हणजे Hero Splendor. जीएसटी कमी झाल्याने याची किंमतही कमी होणार आहे. ज्यांनी नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार केला आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
सरकारने ३५०cc पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी वाहनांवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी केला आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतांश दुचाकी ३५०cc पेक्षा कमी क्षमतेच्या असतात, त्यामुळे सरकारचा हा निर्णय दुचाकी उद्योगासाठी मोठा फायदेशीर ठरेल. Hero Splendor सह इतर अनेक लोकप्रिय मोटरसायकलमध्ये ३५०cc पेक्षा कमी क्षमतेचे इंजिन असते. त्यामुळे या सर्वांच्या किमती कमी होतील.
सध्या Hero Splendor ची किंमत ७९,४२६ रुपये आहे, ज्यावर २८% जीएसटी लागतो. नवीन जीएसटी स्लॅब लागू झाल्यानंतर यावर १८% जीएसटी लागेल आणि याची किंमत ७१,४८३ रुपये होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, Hero Splendor च्या किमतीत ७,९४३ रुपयांची कपात होईल.
हे देखील वाचा: इथे GST कमी झाला आणि तिथे थेट ‘या’ लक्झरी कारची किंमत 30.40 लाखांनी स्वस्त झाली
तुम्ही जर नवीन बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या गाडीवर किती बचत होणार आहे, हे जाणून घ्या.