Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia ने उडवली झोप! बाकी कंपन्या मार्केटमध्ये डाउन? तब्बल २७,६०३…, विषय काय?

कियाचा पोर्टफोलिओ वैविध्‍यपूर्ण होत आहे, जेथे डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. न्‍यू-जनेरशन सेल्‍टोस व सोनेट त्‍यांच्‍या विभागांमध्‍ये प्रगत कनेक्टिव्‍हीटी व ड्रायव्‍हरला साह्य करणारी वैश

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2026 | 05:20 PM
Kia ने उडवली झोप! बाकी कंपन्या मार्केटमध्ये डाउन? तब्बल २७,६०३…, विषय काय?
Follow Us
Follow Us:

किया इंडियाची २७,६०३ युनिट्सची विक्री
१०.३ टक्‍के वाढीसह नववर्ष २०२६ ची दमदार सुरूवात
किया सेल्‍टोसला बाजारपेठेतून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

मुंबई: किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सकारात्‍मकतेसह कॅलेंडर वर्ष २०२६ ची सुरूवात केली, जेथे जानेवारीमध्‍ये एकूण २७,६०३ युनिट्सची विक्री केली. जानेवारी २०२५ मध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या २५,०२५ युनिट्सच्‍या तुलनेत वार्षिक १०.३ टक्‍के वाढीची नोंद करत या कामगिरीमधून कंपनीची स्थिर वाढ, प्रमुख विभागांमध्‍ये स्थिर मागणी आणि भारतातील ग्राहकांमध्‍ये कियाच्‍या वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन ऑफरिंग्‍जसाठी वाढती पसंती दिसून येते.

जानेवारीमध्‍ये कंपनीच्‍या विक्री गतीचे श्रेय पोर्टफोलिओमध्‍ये सतत मागणीला जाते. ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसला बाजारपेठेतून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे, किया सोनेटची कामगिरी कायम राहिली आहे आणि ग्राहकांकडून किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस व क्‍लॅव्हिस ईव्‍हीसाठी सतत पसंती मिळत आहे. न्‍यू-जनरेशन सेल्‍टोस भारतातील सर्वात प्रभावी व मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही म्‍हणून आपला वारसा अधिक दृढ करत आहे, तसेच किया इंडियाच्‍या विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍यास सज्‍ज आहे. सोनेटने उच्‍च आकारमानाच्‍या कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागामध्‍ये ब्रँडची प्रबळ उपस्थिती दर्शवणे सुरूच ठेवले आहे. तसेच, कॅरेन्‍स लाइन-अपने रिक्रिएशन वेईकल व ईव्‍ही क्षेत्रातील कियाची उपस्थिती अधिक प्रबळ केली आहे, ज्‍यामधून वैविध्‍यपूर्ण व भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍ससाठी ग्राहकांची वाढती पसंती निदर्शनास येते.

Kia ने घातला मार्केटमध्ये धुमाकूळ! पुन्हा लाँच केला ‘हा’ जबरदस्त प्रोग्राम; सुरक्षित व स्‍मार्ट….

या मासिक कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. अतुल सूद म्‍हणाले, ”वर्ष २०२६ मधील प्रेरणादायी शुभारंभामधून ग्राहकांचा किया ब्रँडवर सतत असलेला विश्वास दिसून येतो. न्‍यू-जनरेशन सेल्‍टोससाठी सकारात्‍मक प्रतिसाद, सोनेटसाठी स्थिर मागणी आणि कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस व कॅरेन्‍स ईव्‍हीसाठी वाढती लोकप्रियता यामधून आमच्‍या पोर्टफोलिओची क्षमता व संतुलन निदर्शनास येते. या कामगिरीमधून विभागांमध्‍ये वैविध्‍यपूर्ण, भविष्‍यासाठी सुसज्‍ज उत्‍पादने प्रदान करण्‍यावरील, तसेच सतत एकूण मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.”

कियाचा पोर्टफोलिओ वैविध्‍यपूर्ण होत आहे, जेथे डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. न्‍यू-जनेरशन सेल्‍टोस व सोनेट त्‍यांच्‍या विभागांमध्‍ये प्रगत कनेक्टिव्‍हीटी व ड्रायव्‍हरला साह्य करणारी वैशिष्‍ट्ये देतात. तर कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस स्थिर ६-सीटर व ७-सीटर कॉन्फिग्‍युरेशन व तिसऱ्या रांगेमध्‍ये केबिनसह वरचढ ठरते. तसेच कियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल क्‍लॅव्हिस ईव्‍ही व्‍यावहारिक सात-आसनी ईव्‍ही आहे. या ईव्‍हीमध्‍ये कनेक्‍टेड तंत्रज्ञान असण्‍यासह आरामदायीपणा, सुरक्षितता व दैनंदिन उपयुक्‍ततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.

सुव्‍यवस्थित उत्‍पादन पोर्टफोलिओसह किया इंडिया आगामी महिन्‍यांमध्‍ये ही गती कायम ठेवण्‍यास उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे. कंपनी ग्राहकांच्‍या बदलत्‍या अपेक्षांची पूर्तता करत एकूण ब्रँड अनुभव उत्‍साहित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, जेथे ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाच्‍या पाठबळासह वेळेवर उत्‍पादनामध्‍ये सुधारणा करत आहे.

Kia India ने उडवली झोप! भारतीय रस्त्यांवर तब्बल 5 लाख कनेक्टेड कार्स अन्…; वाचा सविस्तर…

कियाचे ३७६ शहरांमधील ८४१ टचपॉइण्‍ट्सचे वाढते नेटवर्क किया ब्रँडला देशभरातील ग्राहकांच्‍या जवळ नेत आहे, तसेच महानगर व उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये सेल्‍स, सर्विस व मालकीहक्‍क साह्य सहजपणे उपलब्‍ध होण्‍याची खात्री घेत आहे. या सुविधेला १२२ सर्टिफाईड प्री-ओन्‍ड आऊटलेट्सचा पाठिंबा आहे, जे ग्राहकांसाठी सुलभ एक्‍स्‍चेंजेस्, त्‍वरित पेमेंट्स आणि त्रासमुक्‍त मालकीहक्‍क हस्‍तांतरणाची खात्री घेतात.

 

Web Title: Kia india sales 27603 cars in january 2026 automobile marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • automobile news
  • Kia Seltos
  • SUV

संबंधित बातम्या

China नंतर आता भारत बनणार जगाचा नवा ‘ऑटो हब’? Tata Technologies चा मोठा दावा
1

China नंतर आता भारत बनणार जगाचा नवा ‘ऑटो हब’? Tata Technologies चा मोठा दावा

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
2

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

Monsoon Bike Care : पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री? या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन विसरा
3

Monsoon Bike Care : पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री? या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन विसरा

EV Battery Recycling: जुन्या ईव्ही बॅटऱ्या ठरणार ‘कमाईचे साधन’; केंद्र सरकारचा ₹1,500 कोटींचा मास्टर प्लॅन जाहीर
4

EV Battery Recycling: जुन्या ईव्ही बॅटऱ्या ठरणार ‘कमाईचे साधन’; केंद्र सरकारचा ₹1,500 कोटींचा मास्टर प्लॅन जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.