फोटो सौजन्य: iStock
कार खरेदी करताना टॅक्स म्हणून ग्राहकांना GST द्यावा लागतो. हाच जीएसटी जास्त असल्याकारणाने यामध्ये सुधारणा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. नागरिकांची हीच मागणी गांभीर्याने घेत सरकारने अखेर जीएसटीत बदल केले. यानुसार, आता छोट्या कारवरील 28 टक्के जीएसटी थेट 18 टक्क्यांवर आला आहे. या सुधारणांनंतर भारतीय वाहन उद्योगात बरीच हालचाल दिसून येत आहे.
जीएसटीत बदल झाल्यानंतर छोट्या कार्सवरील सवलतीबरोबरच, भारतीय बाजारपेठेत लक्झरी कारच्या किमतीही कमी झाल्या आहेत. यासोबतच, JLR इंडियाने घोषणा केली आहे की कंपनी सरकारने अलिकडेच केलेल्या जीएसटी कपातीचे फायदे ग्राहकांना देईल.
जेएलआरकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना 9 सप्टेंबरपासून 30.4 लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्स कपातीचा फायदा मिळणार आहे. वेगवेगळ्या वाहनांच्या किमती किती कमी झाल्या आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
कंपनीच्या फ्लॅगशिप मॉडेल रेंज रोव्हरवर ग्राहकांना सर्वाधिक फायदा मिळणार आहे. नव्या टॅक्स दरांनंतर या SUV च्या किमतींमध्ये तब्बल 4.6 लाखांपासून 30.4 लाखांपर्यंत कपात होणार आहे. मात्र, लक्षात घ्या ही घट मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते.
JLR चा दुसरा लोकप्रिय मॉडेल डिफेंडर देखील आता ग्राहकांना अधिक स्वस्त मिळणार आहे. यात ग्राहकांना 7 लाखांपासून 18.6 लाखांपर्यंत बचत होणार आहे. डिफेंडर तिच्या उत्कृष्ट ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी आणि आधुनिक डिझाइनसाठी ओळखली जाते.
लवकरच ‘या’ 5 Mid Size SUVs लाँच होण्याच्या तयारीत, MG Hector, Seltos सारख्या कारला मिळणार टक्कर
Land Rover Discovery वरही ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच्या विविध व्हेरिएंट्सवर तब्बल 4.5 लाखांपासून 9.9 लाखांपर्यंत कपात करण्यात आली आहे. ही SUV आपल्या प्रीमियम फीचर्ससाठी ओळखली जाते आणि खरेदीदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
JLR इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी सांगितले की, लक्झरी कार्सवरील GST दरातील ही कपात ग्राहकांसाठी आणि संपूर्ण उद्योगासाठी स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे मागणीत वाढ होईल आणि पुढील काळात ऑटो बाजार जलद गतीने वाढेल.