फोटो सौजन्य: Social Media
होंडा मोटोरसायकल अँड स्कूटर्स इंडिया लिमिटेड कंपनी ही आपल्या दमदार बाईक आणि स्कूटरमुळे ओळखली जाते. कंपनीच्या अनेक बाईक आणि स्कूटर ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या आहेत. यातीलच एक म्हणजे होंडा अॅक्टिव्हा. कंपनी सातत्याने या स्कूटरचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणत असते. आज अखेर कंपनीने आपली लोकप्रिय स्कूटर होंडा अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह येईल, ज्याची बुकिंग तुम्ही 1 जानेवारी 2025 पासून करू शकता.
कंपनीने आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर QC1 लाँच केली आहे, ज्याची बॅटरी स्थिर असणार आहे. चला जाणून घेऊया, या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कोणते फीचर्स असणार आहे. तसेच याची काय किंमत असणार आहे.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विकली जाणारी स्कूटर Honda Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन आज म्हणजेच 27 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात लाँच करण्यात आले. लाँच होण्यापूर्वीच याच्या अनेक फीचर्सची माहिती समोर आली होती. जसे की त्याच्या रेंजपासून ते स्वॅप करण्यायोग्य बॅटरीपर्यंतचे तपशील. लाँच झाल्यानंतर, कंपनीने जाहीर केले आहे की त्याचे बुकिंग 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.
Honda ची नवीन इलेक्ट्रिक Activa स्कूटर दोन व्हेरियंटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्याची डिलिव्हरी 1 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. सुरुवातीला ही स्कूटर दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर कंपनी ते इतर शहरांमध्ये लाँच करेल, कारण कंपनी या स्कूटरसाठी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन देखील विकसित करणार आहे.
कंपनी Honda Activa EV ला Standard आणि RoadSync Duo व्हेरियंटमध्ये आणत आहे. यामध्ये, स्टँडर्ड व्हेरियंटचे वजन 118 किलो आणि RoadSync Duo व्हेरियंटचे वजन 119 किलो असेल. यामध्ये वेगवेगळे डिस्प्ले आणि फीचर्स उपलब्ध असतील.
स्टँडर्ड व्हेरियंट प्रमाणेच तुम्हाला ५ इंचाची TFT स्क्रीन मिळेल. यात मर्यादित ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि फंक्शन असतील. तर RoadSync Duo व्हेरियंटमध्ये 7-इंचाचा डॅशबोर्ड असेल, जो तुम्हाला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, नोटिफिकेशन अलर्टची सुविधा देईल.
Honda Activa EV ची झलक समोर येताच, हे स्पष्ट झाले आहे की यात 1.5 kWh च्या ड्युअल स्वॅप करण्यायोग्य बॅटरी असतील. जे एका चार्जमध्ये एकूण 102 किमीची रेंज देईल. या बॅटरी Honda च्या पॉवर पॅक एक्सचेंजर बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर बदलल्या जाऊ शकतात. सध्या कंपनीने बेंगळुरूमध्ये अशी 83 स्टेशन्स बसवली आहेत. तर 2026 पर्यंत, बेंगळुरूमध्ये अशी सुमारे 250 स्टेशन्स असतील, जी तुम्हाला प्रत्येक 5 किमी रेडियसमध्ये बॅटरी बदलण्याचा पर्याय देईल. कंपनी लवकरच दिल्ली आणि मुंबईत हेच काम सुरू करणार आहे.
Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर एकूण 5 कलर ऑप्शन्समध्ये असेल. यात निळ्या रंगाचे दोन व्हेरियंत असतील. पांढरा, राखाडी आणि काळ्या रंगाचे पर्याय देखील उपलब्ध असतील. कंपनीने अद्याप या नवीन स्कॉउटरची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, त्याची किंमत TVS iQube आणि Ather Rizta च्या रेंजमध्ये असेल असे तज्ञांचे मत आहे.