फोटो सौजन्य: Social Media
देशात अनेक आधुनिक कार्स लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक कार्स तसेच इंधनावर चालणाऱ्या कार्सचा देखील समावेश आहे. काही वेळेस ऑटो कंपनीजच्या काही कार्स मार्केटमध्ये इतक्या लोकप्रिय होतात की कंपनी त्याच कारचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणत असते.
भारतीय मार्केटमध्ये होंडा अमेझ ही एक अशी कार आहे जी तिच्या उत्तम डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्समुळे ओळखली जाते. होंडा कंपनी अनेक वर्षांपासून भारत उत्तम कार्स ऑफर करत आहे. आता कंपनीने होंडा अमेझचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. या नवीन कारची किंमत काय आहे, यात कोणते फीचर्स असणार आहे, याची किंमत काय आहे याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Honda Cars ने नवीन जनरेशन Amaze 2024 भारतीय बाजारात लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत. ओल्ड जनरेशच्या तुलनेत कारच्या डिझाइनमध्ये पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. ज्यानंतर या कारचा लूक अधिक आकर्षित दिसत आहे.
MG ची ‘ही’ EV होणार Auto Expo 2025 मध्ये लाँच, फक्त 5 सेकंदात मिळते 100 किमीची स्पीड
नवीन जनरेशन Honda Amaze 2024 मध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स ऑफर केले आहेत. यात एलईडी बाय प्रोजेक्टर हेडलाइट्स, १५ इंच टायर, फ्लोटिंग टचस्क्रीन, सात इंची टीएफटी टचस्क्रीन सेमी डिजिटल स्पीडोमीटर, टॉगल स्विचसह डिजिटल एसी, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो अशी अनेक फीचर्स आहेत.
Honda Amaze 2024 मध्ये कंपनीने अतिशय उत्तम सेफ्टी ऑफर केली आहे. यात कार लोकेशन, जिओ फेंस अलर्ट, ऑटो क्रॅश नोटिफिकेशन, ड्राईव्ह व्ह्यू रेकॉर्डर, स्टोलन व्हेईकल ट्रॅकिंग, स्पीडिंग अलर्ट, अनऑथराइज्ड अॅक्सेस अलर्ट यासारखी 28 हून अधिक अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स आहेत. यामध्ये लेव्हल-2 ADAS देखील ऑफर करण्यात आली आहे, जी या सेगमेंटमधील कारमध्ये प्रथमच सादर केली गेली आहे. यासोबतच सहा एअरबॅग्ज, थ्री पॉइंट सीटबेल्ट, व्हीएसए, ईएलआर, ट्रॅक्शन कंट्रोल, एचएसए, ईबीडी, एबीएस, ईएसएस, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, रिअर पार्किंग सेन्सर स्टँडर्ड म्हणून देण्यात आले आहेत.
फक्त 1 लाखात नुकतीच बाजारात आलेली Skoda Kylaq आणा घरी, भरा एवढा EMI?
Honda कडून नवीन जनरेशन Amaze 2024 मध्ये 1.2 लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. यामुळे याला 90 PS चा पॉवर आणि 110 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. या कारमध्ये दोन ट्रान्समिशन पर्याय ऑफर करेल. यात मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन असेल. हे मॅन्युअल ट्रान्समिशनसह 18.65 किलोमीटर प्रति लिटर आणि CVT सह 19.46 किलोमीटर प्रति लीटर मायलेज मिळेल.
कंपनीने होंडा अमेझच्या V, VX आणि ZX व्हेरियंटमध्ये ऑफर केली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचे मिड व्हेरियंट 9.10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. या कारच्या च्या ZX व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये इतकी एक्स-शोरूम किंमत आणली गेली आहे.