फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये अनेक आकर्षक कार्स लाँच होताना दिसत आहे. यात इंधन आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही कार्सचा समावेश आहे. या कार्समध्ये कंपनी आधुनिक फीचर्स देखील समाविष्ट करत आहे. नुकतेच स्कोडा कंपनीने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक दमदार एसयूव्ही मार्केटमध्ये आणली होती. स्कोडा कायलॅक असे या कारचे नाव आहे.
स्कोडा कंपनी ही आपल्या हाय परफॉर्मन्स कार्समुळे मार्केटमध्ये ओळखली जाते. कंपनीच्या कार्सची महागडी किंमत नेहमीच ग्राहकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. अशावेळी कंपनीने अनेक वर्षानंतर एक अशी कार मार्केटमध्ये आणली आहे जिची किंमत 10 लाखांपेक्षा कमी आहे. ही कार म्हणजे स्कोडा कायलॅक.
Skoda Kylaq च्या विविध व्हेरियंटनुसार किंमती जाहीर, ‘या’ ग्राहकांना मिळणार लिमिटेड ऑफरचा लाभ
स्कोडा कायलॅकची बुकिंग चालू झाली असून, या कारची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून केली जाणार आहे. जर तुम्ही सुद्धा ही आकर्षक एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ही परवडणारी SUV खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट भरावे लागेल आणि EMI चे गणित असेल याबाबत आपण जाणून घेऊया.
स्कोडा कायलॅक 7 लाख 89 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे, तर त्याच्या टॉप स्पेस व्हेरियंटची किंमत 14 लाख 40 हजार रुपये असणार आहे. जर तुम्ही त्याचे बेस व्हेरियंट राजधानी दिल्लीत विकत घेतले तर त्याची ऑन-रोड किंमत 8 लाख 79 हजार 782 रुपये असेल. यामध्ये 55,230 रुपये आरटीओ शुल्क आणि 35,552 रुपये विमा रक्कम समाविष्ट असेल.
जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरून Skoda Kylaq चे बेस व्हेरियंट खरेदी केले तर तुम्हाला 7.79 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. तर यानंतर तुम्हाला 16 हजार 568 रुपयांचा ईएमआय 5 वर्षांच्या कालावधीसाठी 10 टक्के व्याजदराने भरावा लागेल.
वाह काय कार आहे! Jaguar कडून Type 00 इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार सादर, मिळणार 700 KM रेंज
या कारमध्ये 446 लीटरची बूट स्पेस आहे, जी फॅमिली कार म्हणून खूप उपयुक्त आहे. यात 8-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. Skoda Kylaq 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. कारमध्ये बसवलेले हे इंजिन 115 hp ची शक्ती प्रदान करते आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्स उपलब्ध आहे. या कारला 0 ते 100 किमी प्रतितास गती मिळण्यासाठी 10.5 सेकंद लागतात.
Mahindra XUV 3XO, Hyundai Venue, Kia Sonet आणि Tata Nexon सारख्या कार्ससोबत स्कोडा कायलॅकची स्पर्धा असणार आहे.