
Honda Avancier Hybrid SUV Teaser Revealed
होंडा अव्हॅन्सियर हायब्रिड SUV (Honda Avancier Hybrid SUV) लवकरच जागतिक मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. होंडाने या नवीन SUV चा पहिला टीझर जारी केला असून, 1 डिसेंबर 2026 रोजी या गाडीचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता आहे. ही नवीन SUV 7-सीटर स्वरूपात विकसित केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या आंतरराष्ट्रीय कार लिस्टमध्ये ही गाडी होंडा CR-V च्या वरच्या स्थानावर असू शकते. थायलंडमध्ये या SUV चे प्रोडक्शन होण्याची शक्यता असून, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील काही देशांमध्ये ती सेलसाठी आणली जाऊ शकते.
नवीन होंडा अव्हॅन्सियरचा डिझाइन कसा असेल?
होंडा अव्हॅन्सियरच्या टीझरमध्ये गाडीचा संपूर्ण लूक दिसत नसला, तरी तिच्या डिझाइनमधील काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. पुढील बाजूला स्लिम LED डे-टाइम रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत. यामध्ये अॅनिमेटेड लाइटिंग सिक्वेन्स पाहायला मिळतो. मुख्य हेडलॅम्प्स खालच्या बाजूला असल्याने स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन मिळण्याची शक्यता आहे.
Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा
मागच्या बाजूला संपूर्ण टेलगेटवर पसरलेली हॉरिझॉन्टल LED लाइट बार देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना व्हर्टिकल लाइटिंग एलिमेंट्स असल्यामुळे H-आकाराची लाइट सिग्नेचर तयार होते. नवीन होंडा लोगो आणि Avancier बॅजिंगमुळे गाडीला वेगळी ओळख मिळते.
या SUV ची लांबी जवळपास 4,960 mm, रुंदी 1,950 mm आणि उंची 1,690 mm असण्याचा अंदाज आहे. तिचा लूक पारंपरिक बॉक्सी SUV पेक्षा उंचावलेल्या इस्टेट कारसारखा दिसतो. हे माप कंपनीकडून ऑफीशली जाहीर करण्यात आलेले नाही.
EICMA 2026 मध्ये होंडाचा मोठा धमाका! 2027 Africa Twin, Fireblade सह अनेक नव्या बाइक्स सादर
नवीन जनरेशन हायब्रिड टेक्नोलॉजी मिळणार?
या SUV मधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे होंडाची नवीन Hybrid टेक्नोलॉजी. अव्हॅन्सियरमध्ये सुधारित 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमचा ऑप्शन मिळू शकतो. पण इंजिनची कॅपसिटी, पॉवर आणि मायलेज याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. होंडाने मार्च 2030 पर्यंत जागतिक स्तरावर 15 नवीन जनरेशन हायब्रिड मॉडेल्स आणण्याचे नियोजन केले आहे. अव्हॅन्सियर ही या योजनेतील सुरुवातीच्या गाड्यांपैकी एक असू शकते.
भारतात लाँच होणार का?
होंडा अव्हॅन्सियरचा मुकाबला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ह्युंदाई सांता फे, किया सोरेंटो आणि माझदा CX-80 यांसारख्या SUV सोबत होऊ शकतो. भारतात ही SUV लाँच करण्याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारतीय कस्टमर्सना या गाडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 1 डिसेंबरच्या सादरीकरणात तिचे इंटिरियर, हायब्रिड सिस्टम आणि विक्रीसंबंधी जास्त माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
Ans: होंडा अव्हॅन्सियर हायब्रिड SUV चा ग्लोबल डेब्यू 1 डिसेंबर 2026 रोजी होण्याची शक्यता आहे.
Ans: या SUV मध्ये सुधारित 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर्स असलेली नवीन जनरेशन हायब्रिड सिस्टम मिळण्याची शक्यता आहे.
Ans: होंडा अव्हॅन्सियर भारतात लाँच होण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही ऑफीशियल घोषणा केलेली नाही.