फोटो सौजन्य: iStock
देशात नववर्षाचा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत आहे. या जल्लोषात अनेक कंपन्या देखील सामील झाले आहेत. नवीन वर्षात अनेक जण नवीन कार खरेदी करताना दिसतात. हीच बाब लक्षात घेऊन अनेक कंपन्या नवीन कार्स देखील लाँच करताना दिसतात. याव्यतिरिक्त काही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट ऑफर्स देखील देत असतात.
देशात अनेक चांगल्या ऑटो कंपन्या आहेत ज्या ग्राहकांसाठी उत्तम कार्स उपलब्ध करून देत असतात. होंडा कंपनी ही त्यातीलच एक आहे. आता कंपनी नववर्षात आपल्या कार्सवर बंपर डिस्कॉउंट्स देत आहे. गेल्या महिन्यातच, जपानी वाहन निर्मात्यांनी त्यांच्या कारवर सात वर्षांची वॉरंटी किंवा अनलिमिटेड किलोमीटरची एक्सटेंडेड वॉरंटी ऑफर केली आहे. यासोबतच कारवर कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या कार्सवर बंपर डिस्कॉउंट्स मिळत आहे.
‘या’ दिवशी लाँच होणार Honda Elevate Black Edition कार, नव्या डिझाइनसह मिळणार नवे फीचर्स
होंडा अमेझच्या दुसऱ्या जनरेशनमधील मॉडेलचा भारतीय बाजारपेठेत समावेश करण्यात आला आहे. या होंडा कारवर 1.07 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. या कारचे थर्ड जनरेशन मॉडेलही बाजारात आले आहे. डिस्काउंटशिवाय या कारवर 40 हजार रुपयांपर्यंतचे अतिरिक्त बेनिफिट्स दिले जात आहेत. अमेझच्या दुसऱ्या जनरेशनच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 7.19 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.04 लाख रुपयांपर्यंत जाते.
होंडा सिटीच्या पेट्रोल इंजिन व्हेरियंटवर 70 हजार रुपयांचे फायदे दिले जात आहेत. त्याच वेळी, त्याच्या City e: HEV Strong Hybrid व्हेरियंटवर 90 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. या Honda कारची एक्स-शोरूम किंमत 14.18 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.60 लाख रुपयांपर्यंत जाते. Honda Amaze ची स्पर्धा भारतीय बाजारपेठेत Hyundai Verna, Volkswagen Virtus आणि Skoda Slavia सारख्या कारशी आहे.
Hyundai Creta ची प्रतिस्पर्धी Honda Elevate वर देखील बम्पर डिस्काउंट देत आहेत. या कारवर 86,100 रुपयांचे फायदे उपलब्ध आहेत. होंडाच्या या कारचे ॲपेक्स एडिशन आणि ब्लॅक एडिशन येत्या 7 जानेवारी रोजी बाजारात दाखल होणार आहे. Honda Elevate च्या स्टॅंडर्ड मॉडेलची किंमत 11.69 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 16.71 लाख रुपयांपर्यंत जाते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
या होंडा कारमध्ये 1.5-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, ज्यामध्ये मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. या होंडा कारमध्ये बसवलेले इंजिन 121 hp पॉवर देते.