सणासुदीचा काळ संपला असून या वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे अनेक ऑटोमोबाईल कंपन्या पुढील वर्षाबद्दल नियोजन करताना पाहायला मिळत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला अनेक कंपन्यांकडून ऑफर्स दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान Piaggio (पियाजीओ) कंपनीने मात्र त्यांच्या लोकप्रिय स्कूटरवर जबरदस्त सवलत देऊ केली आहे. जाणून घेऊया या बद्दल
Piaggio कंपनीने त्यांच्या वेस्पा (Vespa) आणि एप्रिलिया (Aprilia) या दोन लोकप्रिय स्कूटरवर तब्बल 13,000 रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. सवलतीची ही ऑफर 25 डिसेंबर 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहे. ग्राहक 3 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये या दोन्ही स्कूटरवर सवलत मिळवू शकतात. याबद्दल कंपनीने सविस्तर माहिती दिली आहे.
कंपनीच्या पाच वेस्पा आणि पाच एप्रिलिया मॉडेल्स सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Piaggio ची 13,000 रुपयांची सवलत ही संपूर्ण रोख रक्कमेची सवलत असू शकते किंवा त्यात विनामूल्य विमा किंवा एक्सचेंज ऑफरचाही समाविष्ट असू शकतो. ही सवलतची ऑफर स्कूटरच्या मॉडेल्सनुसार आणि डीलरशिपनुसार वेगळी असू शकते.
वेस्पा (Vespa) स्कूटर इंजिन आणि किंमत
Vespa च्यालाइनअपमध्ये Vespa Classic ZX, VXL, SXL Sports, Vespa Dual, आणि Racing Sixties या मॉडेल्सचा समावेश आहे. जे बाजारात 125 cc आणि 150 cc कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहेत. 125 cc स्कूटर 124.45 cc सिंगल-सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन 9.6 bhp आणि 10.11 Nm पीक टॉर्क निर्माण करते तसेच या स्कूटरला CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहेत. 150 cc मॉडेल्समध्ये 149.5 cc इंजिन आहे, जे 10.6 bhp आणि 11.26 Nm टॉर्क निर्माण करते.
वेस्पाचे दोन्ही मॉडेल्समध्ये रेट्रो स्टाइलिंग, फुल-मेटल बॉडी, कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम इत्यादी घटक उपलब्ध आहेत तर 150 cc मॉडेल्स सिंगल-चॅनल ABS सिस्टिमने सुसज्ज आहे. Vespa स्कूटरची महाराष्ट्रातील एक्स शोरुम किंमत ही 1.15 लाख रुपये ते 1.49 लाख रुपये दरम्यान आहे.
एप्रिलिया (Aprilia) स्कूटर इंजिन आणि किंमत
एप्रिलिया ही स्कूटरच्या Aprilia SR Storm 125, SR 125, SR 160, SXR 125 आणि SXR 160 या मॉडेल्स उपलब्ध आहेत. एप्रिलिया 125 cc प्रकारांमध्ये वेस्पासारखेच 124.45 cc इंजिन सामायिक केले जाते. स्कूटर 9.9 bhp आणि 10.33 Nm टॉर्क निर्माण करते. स्कूटरच्या SXR 160 आणि SR 160 मॉडेल्समध्ये 160 cc इंजिन आहे जे 11.11 bhp पर्यंत आणि 13.44 Nm टॉर्क निर्माण करते. एप्रिलिया स्कूटरच्या महाराष्ट्रातील एक्स शोरुम किंमती या 1.15 लाख ते 1.43 लाख रुपयांपर्यंत आहेत.
कंपनीकडून ऑफर करण्यात 13,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीमुळे ग्राहकांना जवळजवळ 10 टक्क्यांची सवलतीमध्ये स्कूटर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन ग्राहकांसाठी स्कूटर विकत घेण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.