फोटो सौजन्य - Social Media
महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या नव्या इलेक्ट्रिक एसयूवी ‘BE 6e’चा नाव बदलून ‘BE 6’ केला आहे. या नावावरून महिंद्रा आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांचा वाद अगदी न्यायालयाच्या पायरीशी जाऊन पोहचला आहे. इंडिगोची पेरेंट्स कंपनी इंटरग्लोबशी महिंद्रा न्यायालयीन लढा देत आहे. जरी नावात बदल केले गेले असले तरी हा लढा सुरूच असणारा असल्याचे महिंद्राचे म्हणणे आहे. इंटरग्लोबचा दावा आहे कि ‘6E’ हा एअरलाईनचा डिजाईन ट्रेडमार्क आहे. १८ वर्षांपासून कंपनीने याला जपले आहे. परंतु, महिंद्राचे म्हणणे आहे कि त्यांच्या ब्रँडचे नाव ‘BE 6e’ आहे, ‘6e’ नाही. कंपनी म्हणते कि त्यांचा प्रोडक्ट आणि व्यवसाय हे एव्हिएशन क्षेत्रापेक्षा पूर्णता वेगळे आहे. तसेच महिंद्राने हा लढा सुरु ठवेण्याचा निर्धार केला आहे.
अशी झाली वादाची सुरुवात
3 डिसेंबर 2024 रोजी, इंटरग्लोब एविएशनने दिल्ली उच्च न्यायालयात महिंद्राच्या विरोधात खटला दाखल केला. कंपनीचा दावा आहे की महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक SUV BE 6e नावाचा वापर त्यांच्या ‘6E’ ट्रेडमार्कचे उल्लंघन आहे. इंटरग्लोब एविएशनचा असा दावा आहे की ‘6E’ गेल्या 18 वर्षांपासून त्यांच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. हा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे, ज्याला जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे.
हा खटला ९ डिसेंबर २०२४ रोजी न्यायालयात सुनावणीसाठी जाणार आहे. इंटरग्लोबने सांगितले की, “‘6E’ चा कोणत्याही स्वरूपात अनधिकृत वापर आमच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेला आणि ओळखीस हानी पोहोचवणारा आहे. आम्ही आमची बौद्धिक संपदा आणि ब्रँडचे संरक्षण करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलू.” मुळात, २००२ मध्ये टाटाने आपल्या सेडान कारचे नाव इंडिगो ठेवले होते. तर इंटरग्लोब एव्हिएशनने २००६ मध्ये आपल्या फ्लाईटचे नाव इंडिगो ठेवले होते. त्यामुळे कंपनी त्यावेळी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
महिंद्राने या प्रकरणावर त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले आहे कि दोन्ही भारतीय कंपन्यांनी यावर वाद केला नाही पाहिजे. त्यांनी त्यांचे नाव ‘BE 6’ केले आहे. या वादाला त्यांनी येथे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. महिंद्राने आपली पहिली “इलेक्ट्रिक ओरिजिन” SUV ‘BE 6e’ आणि ‘XEV 9e’ 26 नोव्हेंबर 2024 रोजी लाँच केली. 25 नोव्हेंबर रोजी, ट्रेडमार्क रजिस्ट्रारने BE 6e नाव नोंदणीसाठी स्वीकारले होते. जर हे नाव नोंदणीकृत झाले, तर महिंद्राला ‘BE 6e’ नावाचा वापर करण्याचा अधिकार मिळेल.