Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cretaची पुन्हा एकदा बाजी! Hyundaiची सर्वाधिक विकली जाणारी कार बनली

भारतीय कार बाजारात जुलै २०२६ मध्ये Hyundai च्या अनेक मॉडेल्सनी चांगली कामगिरी केली. SUV सोबतच हॅचबॅक आणि सेडान विभागातील काही गाड्यांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, कंपनीच्या विक्रीत Hyundai Creta ने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 15, 2026 | 03:15 PM
Cretaची पुन्हा एकदा बाजी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Cretaची पुन्हा एकदा बाजी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जुलै २०२६ मध्ये Cretaच्या १८,०८८ युनिट्सची विक्री
  • वर्षाच्या तुलनेत विक्रीत सुमारे ७% वाढ
  • Hyundaiच्या विक्रीत Creta ठरली सर्वाधिक लोकप्रिय कार
Auto Moblie News: भारतीय कार बाजारात जुलै २०२६ चा महिना Hyundai साठी काहीसा चांगला ठरला आहे. कंपनीच्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सना ग्राहकांची पसंती मिळाली असून काही गाड्यांच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे SUV सोबतच हॅचबॅक आणि सेडान विभागातील काही गाड्यांनीही चांगली कामगिरी केली. मात्र, प्रत्येक मॉडेलला समान प्रतिसाद मिळालेला नाही.

Hyundai च्या विक्रीचा विचार केला तर Creta ने पुन्हा आपला दबदबा कायम ठेवला आहे. जुलै २०२६ मध्ये या SUV च्या १८,०८८ गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षी याच महिन्यात १६,८९८ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच यंदा विक्रीत सुमारे ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मिड-साइज SUV मध्ये ग्राहकांचा Creta वरील विश्वास अजूनही कायम असल्याचं या आकड्यांवरून दिसतं.

Venue ची मागणीही वाढली

Creta नंतर Venue नेही चांगली कामगिरी केली आहे. जुलै २०२६ मध्ये या कॉम्पॅक्ट SUV च्या ११,०९५ गाड्या ग्राहकांनी घेतल्या. मागील वर्षी हा आकडा ८,०५४ होता. म्हणजेच विक्रीत तब्बल ३८ टक्क्यांची वाढ झाली. आकर्षक लूक, फीचर्स आणि शहरातील वापरासाठी योग्य आकार यामुळे Venue ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.

Exter नेही पकड मजबूत केली

छोट्या SUV वर्गात Hyundai Exter आपली जागा मजबूत करताना दिसत आहे. जुलै २०२६ मध्ये कंपनीने या मॉडेलच्या ६,८१० गाड्या विकल्या. मागील वर्षी जुलैमध्ये ५,०७५ युनिट्सची विक्री झाली होती. यावेळी विक्रीत ३४ टक्के वाढ झाली. कमी बजेटमध्ये SUVसारखा लूक आणि आवश्यक फीचर्स मिळत असल्याने या गाडीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

i20 ने केली मोठी उडी

या संपूर्ण यादीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा आकडा Hyundai i20 चा आहे. जुलै २०२६ मध्ये ६,७३८ युनिट्स विकल्या गेल्या. मागील वर्षी याच काळात केवळ ३,३९६ गाड्या विकल्या गेल्या होत्या. म्हणजेच विक्रीमध्ये तब्बल ९८ टक्क्यांची वाढ झाली. जवळपास दुप्पट विक्रीमुळे i20 ने प्रीमियम हॅचबॅक विभागात पुन्हा आपली ताकद दाखवली आहे.

Aura चीही कामगिरी समाधानकारक

Hyundai Aura नेही कॉम्पॅक्ट सेडानच्या बाजारात स्थिर कामगिरी केली. जुलैमध्ये या कारच्या ५,८१७ युनिट्स विकल्या गेल्या. मागील वर्षी हा आकडा ४,६३६ होता. त्यामुळे वार्षिक आधारावर विक्रीत २५ टक्के वाढ झाली. चांगलं मायलेज, आरामदायी वापर आणि दैनंदिन प्रवासासाठी सोयीस्कर रचना यामुळे Aura ला खास ग्राहकवर्ग मिळताना दिसतो.

Grand i10 चीही गाडी रुळावर

हॅचबॅक विभागातील Grand i10 नेही निराश केलं नाही. जुलै २०२६ मध्ये ४,०५५ युनिट्स विकल्या गेल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये ३,५६० गाड्या विकल्या होत्या. त्यामुळे यंदा सुमारे १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. रोज ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यासाठी वापरली जाणारी कार म्हणून या मॉडेलची मागणी अजूनही टिकून आहे.

Alcazar मात्र मागे पडली

Hyundai च्या सर्व गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी Alcazar ची स्थिती वेगळी आहे. जुलै २०२६ मध्ये या SUV च्या फक्त ८६२ गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षी १,४१९ युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे यावेळी विक्रीत तब्बल ३९ टक्क्यांची घसरण झाली. मोठ्या SUV वर्गातील वाढती स्पर्धा यामागे एक कारण मानलं जात आहे.

रायडर्ससाठी गुड न्यूज! Royal Enfield Himalayan 440 लवकरच बाजारात; किती असेल किंमत?

Verna चीही विक्री घटली

मिड-साइज सेडानमध्ये Verna ला देखील जुलैमध्ये फारसा फायदा मिळाला नाही. या महिन्यात ७३७ युनिट्स विकल्या गेल्या, तर मागील वर्षी हा आकडा ८२६ होता. त्यामुळे विक्रीत ११ टक्क्यांची घट झाली. भारतीय ग्राहकांचा SUV कडे वाढता कल सेडानच्या विक्रीवर परिणाम करत असल्याचं चित्र यामुळे दिसतं.

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’

Hyundai च्या इतर मॉडेल्सकडे पाहिलं तर जुलैमध्ये Ioniq ची केवळ ८ युनिट्स विकली गेली. विशेष म्हणजे Tucson ला या महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही. त्यामुळे कंपनीच्या सर्व मॉडेल्सची कामगिरी सारखी नसल्याचं स्पष्ट होतं

Web Title: Hyundai creta becomes best selling car in july 2026 with 18088 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.