फोटो सौजन्य: Social Media
देशात इलेक्ट्रिक वाहनांचे वारे जोरदार वेगाने वाहत आहे. पूर्वी ज्या ऑटो कंपनी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करत होत्या, त्याच आज इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनाकडे विशेष लक्षकेंद्रित करत आहे. नुकतेच झालेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सुद्धा अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांची झलक दाखवली. ग्राहक सुद्धा या नवनवीन इलेक्ट्रिक कारला पहिले प्राधान्य देत आहे.
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ह्युंदाई. नुकतेच कंपनीने ऑटो एक्सपोमध्ये आपली इलेक्ट्रिक क्रेटा लाँच केली होती. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत १७ लाख ९९ हजार रुपये एक्स-शोरूम आहे. आता कंपनीने ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकसाठी बुकिंग देखील सुरू केली आहे, ज्यामुळे ग्राहक ही कार २५ हजार रुपयांना बुक करू शकतात.
काय सांगता ! प्रदूषण पसरवण्यात पेट्रोल आणि डिझेलच्याही पुढे इलेक्ट्रिक वाहनं, हे झाले तरी कसे?
क्रेटा इलेक्ट्रिकच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, ही कार त्याच्या पेट्रोल-डिझेल इंजिन मॉडेलसारखेच आहे. हुंडई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय दिले आहेत. पहिला ४२ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर ३९० किलोमीटरची रेंज देतो. दुसरा ५१.४ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे, जो ४७३ किलोमीटरपर्यंतची रेंज देतो. त्याच्या व्हेरियंटमध्ये एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्सलन्स यांचा समावेश आहे.
या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये काही खास फीचर्स दिले गेले आहेत, जसे की पॅसेंजर वॉक-इन डिव्हाइस, ज्याद्वारे मागच्या सीटवरील लोकं पुढच्या सीट इलेक्ट्रिकली अॅडजेस्ट करू शकतात. याशिवाय, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेशनसह ड्युअल पॉवर्ड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ADAS लेव्हल २, ३६० डिग्री कॅमेरा, डिजिटल की आणि सस्टेनेबल मटेरियल्स देखील यामध्ये वापरले गेले आहे.
क्रेटाच्या तुलनेत ह्युंदाईने या कारमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत, जसे की फ्रंटमधील फ्रंक्स (पुढील ट्रंक) आणि आतील भागात नवीन स्टेअरिंग व्हील आणि सेंटर कन्सोल. या मॉडेलमध्ये, ग्राहकांना आठ रंगांचा पर्याय मिळतो, ज्यामध्ये दोन ड्युअल-टोन रंगांचा देखील समावेश आहे.
Maruti Brezza खरेदी करण्यासाठी महिन्याला किती द्यावा लागेल EMI? डाऊन पेमेंट कसे असेल
ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये चार्जिंगवरील पैसे देण्यासाठी,इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अॅप पर्याय देण्यात आला आहे, ज्याद्वारे वापरकर्ते सहजपणे पेमेंट करू शकतात. या कारमध्ये NMC बॅटरी बसवण्यात आली आहे, ज्याला ८ वर्षांची वॉरंटी मिळते. हे १७१ बीएचपी इलेक्ट्रिक मोटर आणि ५१.४ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक दिले गेले आहे, जे एक प्रवाशानां उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.