फोटो सौजन्य: iStock
जगाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना मांडण्यात आली. अनेक कंपन्या ईव्हीच्या उत्पादनाकडे वेगाने वाटचाल करत आहेत. नुकत्याच झालेल्या इंडिया ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५ मध्येही जवळजवळ सर्व कंपन्यांनी त्यांच्या ईव्ही वाहनांचे प्रदर्शन केले.
भारत सरकार ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणत आहे. अलीकडेच, भारत सरकारने १०,९०० कोटी रुपयांच्या पीएम ई ड्राइव्ह योजनेला मंजुरी दिली, जेणेकरून लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात अधिकाधिक रस दाखवतील, परंतु पर्यावरणाचे रक्षण या उद्देशाने इलेक्ट्रिक वाहने बनवली गेली, तो उद्देश खरंच पूर्ण होत आहे का? चला जाणून घेऊया.
KTM 390, Hero Mavrick 440 चे धाबे दणाणणार, फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच होऊ शकते ‘ही’ भन्नाट बाईक
एका अहवालानुसार, जेव्हा ईव्ही आणि सामान्य इंजिनच्या उत्सर्जनाची तुलना केली गेली तेव्हा असे आढळून आले की ईव्हीच्या एकूण कार्बन उत्सर्जनापैकी ४६ टक्के उत्सर्जन केवळ उत्पादन प्रक्रियेतून होते. तर पेट्रोल-डिझेल वाहनांमध्ये ते २६ टक्के आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान सुमारे ५-१० टन कार्बन डायऑक्साइड (CO2) बाहेर पडतो.
आपल्या सर्वांना माहित आहे की ईव्ही आणि सामान्य वाहनांचे बॉडी, चेसिस आणि इतर घटक जवळजवळ सारखेच असतात. हे बनवण्यासाठी अॅल्युमिनियम आणि स्टील सारख्या धातूंचा वापर केला जातो. या वाहनांमध्ये फक्त इंधनाचा फरक आहे. सामान्य वाहने पेट्रोल आणि डिझेल वापरतात, तर ईव्ही बॅटरीवर चालतात. या वाहनांमध्ये वापरली जाणारी बॅटरी लिथियम आयन आहे.
IMF च्या अहवालानुसार, कारची बॅटरी बनवण्यासाठी ८ किलो लिथियम, ६ ते १२ किलो कोबाल्ट आणि ३५ किलो मॅंगनीज वापरले जाते. यापैकी, कोबाल्ट हा एक दुर्मिळ धातू आहे, जो सहज उपलब्ध नाही होत. म्हणून, कंपन्या कोबाल्टऐवजी निकेल वापरतात, जे कोबाल्टपेक्षा खूपच स्वस्त आहे. निकेलचे खाणकाम हा पर्यावरणासाठी सर्वात मोठा धोका आहे. लिथियम आणि कोबाल्ट सारख्या धातूंच्या उत्खननामुळे, इलेक्ट्रिक वाहनांचा कार्बन फूटप्रिंट सामान्य वाहनांपेक्षा खूप जास्त असतो.
बाइकमध्ये Rowdy फील हवाय? ‘या’ आहेत Best Cruiser Bikes; लुकमध्ये कमाल
अलिकडेच काही अभ्यासातून असा दावा करण्यात आला आहे की इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा जास्त प्रदूषण पसरवू शकतात. एमिशन अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, ईव्ही ब्रेक आणि टायर्समधील कणयुक्त पदार्थ हे अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) वाहनांपेक्षा १,८५० पट जास्त असू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे ईव्हीचे वजन जास्त असते, जे त्यांच्या बॅटरीमुळे असते. जास्त वजनामुळे टायर्स आणि ब्रेकवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे झीज वाढते आणि जास्त कण उत्सर्जन होते. याशिवाय, ईव्ही बॅटरीच्या उत्पादन प्रक्रियेत पर्यावरणीय चिंता देखील समाविष्ट आहेत.