Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ह्युंदाईची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? Hyundai Ioniq P Electric SUV; डिसेंबर 2026 मध्ये होणार एन्ट्री! पाहा फीचर्स

Hyundai Ioniq P Electric SUV डिसेंबर 2026 मध्ये जागतिक स्तरावर सादर होण्याची शक्यता आहे. 2 बॅटरी ऑप्शन, Level 2 ADAS आणि नवीन टेक्नोलॉजीसह येणारी ही SUV क्रेटा इलेक्ट्रिकच्या खाली स्थान मिळवू शकते. पण तिची किंमत किती असेल?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 16, 2026 | 06:49 PM
Hyundai Ioniq P Upcoming Electric SUV India (फोटो सौजन्य-AI एआय)

Hyundai Ioniq P Upcoming Electric SUV India (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाईची नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV डिसेंबर 2026 मध्ये जागतिक स्तरावर सादर होण्याची शक्यता आहे.
  • या गाडीमध्ये 42 kWh आणि 49 kWh बॅटरीसारखे 2 ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे.
  • टाटा नेक्सॉन EV आणि महिंद्रा XUV 3XO EV सोबत नवीन SUV ची स्पर्धा होऊ शकते.
भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी Hyundai Ioniq P Electric SUV लवकरच एन्ट्री करणार आहे. ह्युंदाईची ही नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV डिसेंबर 2026 मध्ये जागतिक स्तरावर सादर होण्याची शक्यता आहे. HE1i या कोडनेमने विकसित होत असलेल्या या मॉडेलमध्ये 2 बॅटरी ऑप्शन आणि Level 2 ADAS सारखी आधुनिक टेक्नोलॉजी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही गाडी भारतातील ह्युंदाईची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरू शकते.

ह्युंदाईने अलीकडेच Ioniq P या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज ऑटोमोबाईलशी संबंधित Class 12 अंतर्गत करण्यात आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनानेही आर्थिक चर्चेदरम्यान या नावाचा उल्लेख केला होता. पण या नावाचा नवीन इलेक्ट्रिक SUV शी असलेला संबंध कंपनीने अजून ऑफीशली जाहीर केलेला नाही. ही गाडी सध्याच्या क्रेटा इलेक्ट्रिकच्या खाली स्थान मिळवेल.

नोव्हेंबरमध्ये Hyundai कार्सवर मोठ्या डिस्काउंटचा पाऊस! ग्राहकांना मिळणार 1.2 लाखांपर्यंत सूट

नवीन SUV मध्ये E-GMP (K) प्लॅटफॉर्म वापरण्यात येणार आहे. हाच प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय मार्केटमधील ह्युंदाई इन्स्टरमध्येही वापरला जातो. इन्स्टरमध्ये 42 kWh आणि 49 kWh असे 2 बॅटरी ऑप्शन मिळतात. भारतीय मॉडेलमध्येही 2 बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. पण कंपनीने अद्याप त्यांची रेंज आणि चार्जिंगविषयीची माहिती जाहीर केलेली नाही.

डिझाइनच्या बाबतीत या इलेक्ट्रिक SUV मध्ये उंच आणि चौकोनी आकाराची बॉडी, जवळपास सरळ छत, अरुंद LED DRL, रूफ रेल्स आणि ड्युअल टोन अलॉय व्हील्स मिळतील. भारतात टेस्टिंगदरम्यान या गाडीचे कॅमफ्लाज केलेले मॉडेल दिसले आहे. तिचा लूक क्रेटा इलेक्ट्रिकपेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे. फीचर्समध्ये Level 2 ADAS, नवीन इन्फोटेनमेंट इंटरफेस आणि कनेक्टेड कार सुविधा मिळणार आहेत. अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन कीपिंग असिस्ट यांसारखी सुरक्षा फीचर्स मिळू शकतात.

Upcoming 7-Seater SUVs India: भारतात येणार 6 नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड SUV! टाटा ते ह्युंदाईपर्यंत कोणकोण आहेत फार्मात

या SUV चे प्रोडक्शन तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर कारखान्यात केले जाणार आहे. सुरुवातीला बॅटरी सेल्ससाठी कंपनी Svolt कडून पुरवठा घेणार आहे. पुढे देशांतर्गत सेल प्रोडक्शन सुरू झाल्यावर भारतीय बनावटीच्या सेल्सचा वापर करण्याची योजना आहे.

सध्या टाटा नेक्सॉन EV, महिंद्रा XUV 3XO EV आणि किया सिरॉस EV यांच्याशी या गाडीची स्पर्धा होऊ शकते. ह्युंदाईला FY26 मधील 1 टक्क्यांवरून पुढील वर्षात भारतीय विक्रीतील इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 7 टक्क्यांपेक्षा जास्त करायचा आहे. त्यामुळे Hyundai Ioniq P ची किंमत, रेंज आणि फीचर्स भारतीय कस्टमर्सचा प्रतिसाद ठरवण्यात महत्त्वाचे ठरतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Hyundai Ioniq P Electric SUV कधी लाँच होणार आहे?

    Ans: या SUV चे जागतिक पदार्पण डिसेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. भारतातील विक्रीची तारीख अजून जाहीर झालेली नाही.

  • Que: Hyundai Ioniq P मध्ये किती बॅटरी ऑप्शन मिळतील?

    Ans: या गाडीमध्ये 2 बॅटरी ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे. 42 kWh आणि 49 kWh क्षमतेचे पॅक अपेक्षित आहेत. पण भारतीय मॉडेलची नेमकी माहिती समोर आलेली नाही.

  • Que: Hyundai Ioniq P ची स्पर्धा कोणत्या इलेक्ट्रिक कारशी होईल?

    Ans: भारतीय मार्केटमध्ये या SUV ची स्पर्धा टाटा नेक्सॉन EV, महिंद्रा XUV 3XO EV आणि किया सिरॉस EV यांच्याशी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Hyundai ioniq p electric suv india launch battery adas auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • SUV cars

संबंधित बातम्या

न्यूमेरोस मोटर्सची खास मोहीम! ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवीसह 3 महिला खेळाडूंना ‘N-First’ इलेक्ट्रिक वाहनांची भेट
1

न्यूमेरोस मोटर्सची खास मोहीम! ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवीसह 3 महिला खेळाडूंना ‘N-First’ इलेक्ट्रिक वाहनांची भेट

Kinetic DX Electric Scooter ची 7,000 युनिट्स विक्री! 132 km रेंज, 3.1 kWh बॅटरीसह ग्राहकांची पसंती
2

Kinetic DX Electric Scooter ची 7,000 युनिट्स विक्री! 132 km रेंज, 3.1 kWh बॅटरीसह ग्राहकांची पसंती

जॅग्वार लँड रोव्हरची चीनमध्ये विक्रीत मोठी घसरण! चीनमधील विक्री 45% कोसळली, टाटा मोटर्ससमोर नवे आव्हान
3

जॅग्वार लँड रोव्हरची चीनमध्ये विक्रीत मोठी घसरण! चीनमधील विक्री 45% कोसळली, टाटा मोटर्ससमोर नवे आव्हान

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्ये विक्रमी विक्री! Wagon R नंबर 1, Brezza आणि Alto ची मोठी झेप
4

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्ये विक्रमी विक्री! Wagon R नंबर 1, Brezza आणि Alto ची मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.