Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूमेरोस मोटर्सची खास मोहीम! ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवीसह 3 महिला खेळाडूंना ‘N-First’ इलेक्ट्रिक वाहनांची भेट

मैदानावरील जिद्द आणि मेहनतीचा सन्मान करण्यासाठी Numeros Motors ने Vibe Movers उपक्रम सुरू केला आहे. ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवीसह 3 महिला खेळाडूंचा यात गौरव झाला असून, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 16, 2026 | 06:32 PM
Numeros Motors Vibe Movers Women Athletes Campaign (फोटो सौजन्य-AI एआय)

Numeros Motors Vibe Movers Women Athletes Campaign (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • न्यूमेरोस मोटर्सच्या व्हाइब मूव्हर्स मोहिमेत तीन भारतीय महिला खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
  • भवानी देवी, यशस्विनी घोरपडे आणि मिथिला रमानी यांना कंपनीकडून एन-फर्स्ट इलेक्ट्रिक वाहने भेट मिळाली आहेत.
  • महिला खेळाडूंचा संघर्ष, मेहनत आणि यशोगाथा देशभरातील नव्या खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
ज्या खेळाडूंच्या प्रवासाला अधिक ओळख मिळणे आवश्यक आहे, अशा भारतीय महिला खेळाडूंच्या असामान्य कामगिरीचा गौरव करण्यासाठी न्यूमेरोस मोटर्सने ‘व्हाइब मूव्हर्स’ ही विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवी, राष्ट्रीय टेबल टेनिस विजेती यशस्विनी घोरपडे आणि राष्ट्रीय फुटसल खेळाडू मिथिला रमानी यांच्या प्रेरणादायी यशोगाथा मांडण्यात आल्या आहेत. आगामी काळात आणखी खेळाडूंचा प्रवास या मालिकेतून लोकांसमोर आणण्याची कंपनीची योजना आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, खेळाडूंची प्रतिभा आणि जिद्द यांचा गौरव करण्यासाठी न्यूमेरोसने प्रत्येक खेळाडूला ‘एन-फर्स्ट’ हे वाहन सस्नेह भेट म्हणून दिले आहे.

‘व्हाइब मूव्हर्स’ ही मालिका केवळ पदके आणि सन्मानांपुरती मर्यादित नसून, क्रीडा क्षेत्रातील यशामागील खऱ्या संघर्षाचा वेध घेते—ज्यात कठोर सराव, दुखापती आणि अपयश यांचा समावेश असतो. ही मालिका न्यूमेरोसच्या ‘क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेइकल्स’ (सीयूव्ही) या दुचाकींमागील मूळ तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये पारंपरिक वाहनांची ताकद व टिकाऊपणा आणि इलेक्ट्रिक वाहनांची किफायतशीर चालन क्षमता यांचा सुरेख संगम साधला आहे.

Kinetic DX Electric Scooter ची 7,000 युनिट्स विक्री! 132 km रेंज, 3.1 kWh बॅटरीसह ग्राहकांची पसंती

याप्रसंगी ‘न्यूमेरोस मोटर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण श्रीवास्तव म्हणाले,”न्यूमेरोसमध्ये आमची सीयूव्ही वाहने ग्राहकांच्या दैनंदिन प्रवासातील विविध पैलूंना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता आणि ताकद देणारी मजबूत व विश्वासार्ह साथीदार म्हणून घडवली गेली आहेत. ‘व्हाइब मूव्हर्स’मध्ये सहभागी झालेल्या विजेत्या खेळाडूंमध्येही हीच जिद्द दिसून येते. आव्हानांवर मात करून विजेतेपद पटकावण्याची त्यांची चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय आम्हाला सदैव प्रेरणा देतात.”

या तिन्ही खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी वाट निवडून यशाचा मार्ग तयार केला आहे. टोकियो २०२० ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भवानी देवी ही भारताची पहिली ऑलिम्पिक तलवारबाज आहे. तिने राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०२३ च्या आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पहिले ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले असून, २०२१ मध्ये तिला ‘अर्जुन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. दुसरीकडे, यशस्विनी घोरपडे हिने कनिष्ठ गटापासून प्रवास सुरू करत मार्च २०२६ मध्ये इंदूर येथे प्रथमच वरिष्ठ गटातील राष्ट्रीय महिला टेबल टेनिस विजेतेपद पटकावले असून, ती जागतिक टेबल टेनिस स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते.

आपल्या प्रवासाविषयी यशस्विनी घोरपडे म्हणाली, “दररोज न चुकता मैदानावर हजर राहणे, सातत्याने सराव करणे आणि निराशाजनक दिवसांतही हार न मानणे यातूनच प्रगती घडते. अशाच प्रकारे मी भारताची राष्ट्रीय विजेती बनले. म्हणूनच न्यूमेरोस मोटर्स मला प्रगतीच्या वाटेवरील खरा साथीदार वाटतो. मी माझ्या खेळाप्रती जो अखंड उपयुक्ततावादी दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करते, तेच मूल्य त्यांच्या क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेइकल्समधून दिसून येते. ‘व्हाइब मूव्हर्स’मुळे महिला खेळाडूंना आम्ही कमावलेली हक्काची ओळख मिळत आहे आणि या उपक्रमाचा भाग होता आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

अभियांत्रिकी शिक्षण सोडून व्यावसायिक फुटबॉल आणि फुटसल निवडणाऱ्या *मिथिला रमानी हिने* जानेवारी २०२६ मध्ये मालदीवविरुद्धच्या भारताच्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय महिला फुटसल सामन्यात ११-१ च्या दणदणीत विजयात भारतासाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर पहिल्या ‘सॅफ महिला फुटसल अजिंक्यपद’ स्पर्धेत भारताने रौप्यपदक जिंकले.

*या निमित्ताने मिथिला रमानी म्हणाली,* “स्थानिक मैदानांवर खेळण्यापासून ते भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी मला दहा वर्षांहून अधिक काळ लागला. पहिल्या सॅफ महिला फुटसल अजिंक्यपद स्पर्धेतील पदार्पणाचा गोल आणि रौप्यपदक मिळण्यापूर्वी या प्रवासात अनेक वळणे, जय-पराजय आणि पायाचे फ्रॅक्चर अशा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. व्यावसायिक खेळाडू बनण्यासाठी लागणारी चिकाटी आणि जिद्द न्यूमेरोसच्या क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेइकल्समधून अधोरेखित होते आणि ‘व्हाइब मूव्हर्स’ मोहीम आमच्यासारख्या कठीण वाटेवरून चालणाऱ्या खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देते. ‘एन-फर्स्ट’ सीयूव्ही हे पुढील प्रवासासाठी सज्ज असलेले वाहन आहे. ‘व्हाइब मूव्हर्स’ मालिकेचा भाग असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूमेरोस मोटर्सची Vibe Movers मोहीम काय आहे?

    Ans: Vibe Movers ही भारतीय महिला खेळाडूंच्या संघर्षाचा आणि यशाचा गौरव करणारी न्यूमेरोस मोटर्सची विशेष मोहीम आहे.

  • Que: या मोहिमेत कोणत्या महिला खेळाडूंचा सन्मान करण्यात आला?

    Ans: ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवी, राष्ट्रीय टेबल टेनिस विजेती यशस्विनी घोरपडे आणि फुटसल खेळाडू मिथिला रमानी यांचा सन्मान करण्यात आला.

  • Que: या तिन्ही खेळाडूंना कोणती भेट देण्यात आली?

    Ans: न्यूमेरोस मोटर्सने तिन्ही खेळाडूंना कंपनीचे N-First CUV इलेक्ट्रिक वाहन सस्नेह भेट म्हणून दिले आहे.

Web Title: Numeros motors vibe movers honours indian women athletes auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Sports
  • two wheelers

संबंधित बातम्या

Kinetic DX Electric Scooter ची 7,000 युनिट्स विक्री! 132 km रेंज, 3.1 kWh बॅटरीसह ग्राहकांची पसंती
1

Kinetic DX Electric Scooter ची 7,000 युनिट्स विक्री! 132 km रेंज, 3.1 kWh बॅटरीसह ग्राहकांची पसंती

जॅग्वार लँड रोव्हरची चीनमध्ये विक्रीत मोठी घसरण! चीनमधील विक्री 45% कोसळली, टाटा मोटर्ससमोर नवे आव्हान
2

जॅग्वार लँड रोव्हरची चीनमध्ये विक्रीत मोठी घसरण! चीनमधील विक्री 45% कोसळली, टाटा मोटर्ससमोर नवे आव्हान

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्ये विक्रमी विक्री! Wagon R नंबर 1, Brezza आणि Alto ची मोठी झेप
3

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्ये विक्रमी विक्री! Wagon R नंबर 1, Brezza आणि Alto ची मोठी झेप

नॉर्टनच्या 2 नवीन बाइक्स भारतात येणार! Manx R आणि Atlas GT चे डिझाइन पेटंट बुक! पाहा डिटेल्स
4

नॉर्टनच्या 2 नवीन बाइक्स भारतात येणार! Manx R आणि Atlas GT चे डिझाइन पेटंट बुक! पाहा डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.