फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये दिवसेंदिवस कारच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार उत्पादक कंपन्या बेस्ट कार ऑफर करत असतात. पण खऱ्या अर्थाने भारतीय ग्राहकांना आकर्षित करायचे असेल तर मग कंपन्यांना कारच्या किमतीवर विशेष लक्ष द्यावे लागते. भारतीय कार खरेदीदाराला स्वस्त किमतीत उत्तम कार हवी असते. त्यातही कारवर ऑफर असेल तर मग ‘सोने पर सुहागा’.
साऊथ कोरियन वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई भारतात अनेक वर्षांपासून बेस्ट कार आणि एसयूव्ही ऑफर करत आहे. आता कंपनी फेब्रुवारी २०२५ मध्ये आपल्या काही कारवर दमदार ऑफर देत आहे, ज्यात ग्राहक हजारो रुपयांची बचत करू शकतात. चला जाणून घेऊया, या महिन्यात तुम्ही कोणती कार खरेदी करून किती रुपयांची बचत करू शकता?
‘या’ मेड इन इंडिया कारची जपानी लोकांना भुरळ, रेकॉर्डब्रेक मागणीनंतर बुकिंग थांबवली
ह्युंदाई एक्सटर ही चार मीटरपेक्षा कमी लांबीची एसयूव्ही आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये या एसयूव्हीवर कंपनीकडून हजारो रुपयांची Discount Offer दिली जात आहे. माहितीनुसार, या महिन्यात ही कार खरेदी करून जास्तीत जास्त 40 हजार रुपये वाचवता येतील.
ह्युंदाई आय20 ही कंपनीने प्रीमियम हॅचबॅक म्हणून लाँच केली आहे. फेब्रुवारी महिन्यात या एसयूव्हीवर ६५ हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. ही बचत फक्त त्याच्या नॉर्मल व्हर्जनवर दिली जात आहे, सध्या त्याच्या एन लाइन व्हर्जनवर कोणत्याही प्रकारच्या सवलतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ह्युंदाई ऑरा ही भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट सेडान कार म्हणून सादर केली जाते. माहितीनुसार, जर ही कार या महिन्यात खरेदी केली तर जास्तीत जास्त 53 हजार रुपयांची बचत होऊ शकते.
OLA Electric नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत, 5 फेब्रुवारीला पाहायला मिळणार झलक
ह्युंदाई ग्रँड निओस आय१० ही भारतातील ह्युंदाईची सर्वात स्वस्त कार म्हणून हॅचबॅक सेगमेंटमध्ये लाँच केली गेली आहे. या महिन्यात ही कार खरेदी करून हजारो रुपये वाचवता येतील. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या या कारवर जास्तीत जास्त 68 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
ह्युंदाईची ही ऑफर फक्त 2024 मध्ये उत्पादित झालेल्या युनिट्सवर दिली जात आहे. अनेक डीलर्सकडे असे काही युनिट शिल्लक आहेत ज्यावर या ऑफर्स दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कार खरेदी करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या शहरातील वेगवेगळ्या शोरूमला भेट देऊन डिस्काउंटच्या ऑफरबद्दल माहिती मिळवू शकता.