Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors आणि Maruti Suzuki ला धडकी भरणार! Hyundai च्या 3 नवीन Cars ची मार्केटमध्ये होणार एंट्री

ह्युंदाई मोटर्स भारतीय ग्राहकांसाठी त्यांच्या तीन नवीन कार्स लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. चला या नव्या मॉडेल्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 21, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • Hyundai Motors तीन नवीन कार्स आणायच्या तयारीत
  • टाटा आणि मारुतीच्या वाहनांसोबत असेल स्पर्धा
  • जाणून घ्या या 3 मॉडेल्सबद्दल
Hyundai Motor India भारतात आपली मजबूत पकड कायम ठेवण्यासाठी मोठी रणनीती आखत आहे. मागील वर्षी कंपनीने आपल्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही Hyundai Venue चे अपडेटेड मॉडेल सादर केले होते. आता 2026 मध्ये कंपनी तीन महत्त्वाच्या कार लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. यामध्ये Hyundai Exter फेसलिफ्ट, Hyundai Verna फेसलिफ्ट आणि एक नवीन कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हरचा समावेश आहे. या नव्या मॉडेल्समुळे Maruti Suzuki आणि Tata Motors यांना कडवी स्पर्धा मिळू शकते.

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया

नवीन Hyundai Exter 2026 फेसलिफ्ट

Exter फेसलिफ्टमध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरिअर डिझाइनमध्ये हलके पण महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. पुढील बाजूस नव्या डिझाइनची ग्रिल, सुधारित बंपर आणि H-शेप डीआरएल देण्यात येऊ शकतात. मागील बाजूस नवीन टेलगेट, टेललॅम्प आणि रिअर बंपर मिळण्याची शक्यता आहे.

इंटिरिअरमध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच नव्या ट्रिम्स आणि सीट कव्हरिंगचा समावेश असू शकतो. इंजिनमध्ये मोठा बदल अपेक्षित नसून 1.2 लिटर पेट्रोल इंजिन (सुमारे 82 बीएचपी पॉवर) उपलब्ध राहील. सीएनजी पर्यायही कायम ठेवला जाईल.

नवीन Hyundai Verna 2026 फेसलिफ्ट

Verna फेसलिफ्टमध्ये मोठा ड्युअल-स्क्रीन सेटअप, नवीन स्टीयरिंग व्हील आणि ड्युअल-टोन इंटिरिअर दिला जाऊ शकतो. फीचर्स सध्याच्या मॉडेलसारखेच राहतील; मात्र डिझाइन आणि तंत्रज्ञानात सुधारणा होईल.
इंजिन पर्यायांमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल (160 बीएचपी, 253 एनएम टॉर्क) आणि 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल (115 बीएचपी) इंजिनचा समावेश असेल. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध राहतील.

Toll Plaza New Rules: प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता ‘कॅश’ चालणार नाही; आता केवळ FASTag आणि UPI अनिवार्य

नवीन Hyundai कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर

हुंडईची आगामी कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर जागतिक मॉडेल Hyundai Bayon वर आधारित असू शकते. भारतीय बाजारासाठी हे मॉडेल 4 मीटरपेक्षा कमी लांबीचे असेल आणि 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता आहे.

यामध्ये नवीन 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे भविष्यात हायब्रिड तंत्रज्ञानासाठी तयार असेल. तसेच 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्यायही मिळू शकतो.

Web Title: Hyundai motors will launch 3 new cars compete with tata motors and maruti suzuki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • new car

संबंधित बातम्या

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!
1

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!
2

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका
3

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका

इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांसाठी लीजिंग सुविधा देण्यासाठी ‘ड्रिव्हन’आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार!
4

इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांसाठी लीजिंग सुविधा देण्यासाठी ‘ड्रिव्हन’आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.