फोटो सौजन्य: www.hyundai.com
भारतीय बाजारात अनेक सेगमेंटमध्ये कार विकल्या जातात. ग्राहक देखील आपल्या बजेटनुसार या कार खरेदी करत असतात. खरंतर आपली स्वतःची कार खरेदी करणे हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते.आता हे स्वप्न सत्यात उतरत आहे. तेही कार लोनच्या सोबतीने.
भारतीय मार्केटमध्ये अनेक बेस्ट कार ऑफर केल्या जातात. Hyundai भारतीय बाजारपेठेत हॅचबॅकपासून एसयूव्ही सेगमेंटपर्यंत अनेक वाहने ऑफर करते. जर तुम्ही कंपनीच्या मिड साईज सेडान कार म्हणून ऑफर करण्यात आलेल्या Hyundai Verna चा मिड व्हेरियंट S खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तीन लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून ती कार घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेणे महत्वाचे.
Honda कडून ‘ही’ नवीन बाईक मार्केटमध्ये लाँच, स्पोर्ट लूक असून देखील किंमत अगदी मापक
ह्युंदाई कंपनी व्हर्नाचा मिड व्हेरियंट म्हणून S ऑफर करते. या कारच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 12.12 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केले तर आरटीओला सुमारे 1.28 लाख रुपये आणि विम्यासाठी सुमारे 51 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, टीसीएस शुल्क म्हणून 12124 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर Hyundai Verna S ची ऑन रोड किंमत सुमारे 14.04 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा मिड व्हेरिएंट S खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 11.04 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 11.04 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 17773 रुपये ईएमआय भरावा लागेल.
होंडाकडून नवीन 2025 Honda Shine 125 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 11.04 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 17773 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला Hyundai Verna S साठी सुमारे 3.88 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 17.92 लाख रुपये होईल.
Verna ही ह्युंदाईने Mid Size Sedan Car म्हणून ऑफर केली आहे. कंपनीची ही कार बाजारात थेट स्कोडा स्लाव्हिया, फोक्सवॅगन व्हर्टस, होंडा सिटी आणि मारुती सियाझशी स्पर्धा करते.