भारताचा लाडका फलंदाज Suryakumar Yadav च्या ताफ्यात एकापेक्षा एक लक्झरी कार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईत होत आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा दुसरा सामना आहे. याआधी पहिल्या सामन्यात भारताने यूएईवर विजय मिळवला होता, तर पाकिस्तानने ओमानला पराभूत केले आहे. आशिया कप 2025 साठी भारतीय संघाचे नेतृत्व Suryakumar Yadav करत आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज म्हणून ओळखला जाणारा सूर्या आपल्या तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.
मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पडणाऱ्या सूर्याचे छंद मात्र केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नाहीत. खऱ्या आयुष्यातही त्यांना महागड्या आणि आलिशान कारची खास आवड आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये अशा अनेक लक्झरी कार उभ्या आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाते. चला, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सूर्यकुमार यादवच्या गॅरेजमधील पहिली कार म्हणजे मर्सिडीज GLS 400d. यात 3.0-लिटर, 6-सिलिंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 330 हॉर्सपॉवर आणि 700 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 9G-TRONIC ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जोडलेला आहे, जो चारही चाकांना पॉवर देतो. त्यामुळे ही लक्झरी SUV फक्त 6.3 सेकंदांत 0 ते 100 किमी/ताशी स्पीड पकडू शकते. सूर्यकुमारला अनेकदा या कारमध्ये प्रवास करताना पाहिले गेले आहे. या गाडीची किंमत सुमारे 1.37 कोटी रुपये आहे.
GST कमी झाला आणि थेट ‘ही’ स्वस्तात मस्त बाईक अजूनच स्वस्त झाली, नवीन किंमत…
सूर्यकुमार यादवच्या कार कलेक्शनमधील पुढची कार म्हणजे टोयोटा वेलफायर. ही देशातील सर्वात लोकप्रिय लक्झरी MPV पैकी एक आहे. यात 2.5-लिटर, इनलाइन फोर-सिलिंडर DOHC सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे, जे 193 PS पर्यंत पॉवर आणि 240 Nm टॉर्क जनरेट करते. हा इंजिन CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे. त्याशिवाय, हा हायब्रिड पॉवरट्रेन 19.28 किमी/लिटर इतका प्रभावी मायलेज देतो. या आलिशान MPV ची सुरुवातीची किंमत 1.22 कोटी रुपये आहे.
Honda च्या ‘या’ बाईकमध्ये आली मोठी खराबी, कंपनीने युनिट्स बोलवले परत
सूर्याची सर्वात महागडी कार मर्सिडीज जी-वॅगन आहे. ही जगातील सर्वात लोकप्रिय लक्झरी ऑफ-रोडिंग एसयूव्हींपैकी एक आहे. जी-वॅगनमध्ये पॉवरफुल 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 पेट्रोल इंजिन आहे, जे 585 हॉर्सपॉवर आणि 850 एनएमची पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक एएमजी स्पीड शिफ्ट ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, जे सर्व चारही चाकांना शक्ती देते. या कारची सुरुवातीची किंमत 2.55 कोटी रुपये आहे. याशिवाय सूर्याकडे BMW 3 GT आणि Land Rover Range Rover Velar देखील आहे.