बॉलिवूडची क्वीन Kangana Ranaut कडून 'ही' आलिशान कार खरेदी, किंमत ऐकाल तर बेशुद्ध व्हाल
कंगना रणौत ही एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयामुळे तर ओळखली जातेच पण त्याहीपलीकडे तिच्या वादग्रस्त व्यक्त्यांमुळे तिची जास्त चर्चा होत असते. जेव्हापासून कंगना खासदार झाली आहे तेव्हापासून तिच्या वक्तव्यांची चर्चा होताना दिसत आहे.
शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलणं असो की चंदीगड विमानतळावर सगळ्यांसमोर कानाखाली खाऊन घेणं असो, कंगनाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तसेच तिचा आगामी चित्रपट इमर्जन्सी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, ज्यामुळे चित्रपटाची रिलीज देत ही सारखी पुढे ढकलली जात आहे. यातच आता कंगनाने एक नवीन आलिशान कार घेतली आहे.
हे देखील वाचा: बाप रे! ‘ही’ बाईक देते 102 किलोमीटरचा मायलेज, आता होईल बचतच बचत
रविवारी, लँड रोव्हर मोदी मोटर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटने काही फोटोस शेअर केले ज्यामध्ये कंगना तिच्या आलिशान कारसोबत पोज देताना दिसत आहे. अल्बममध्ये पुतण्या अश्वत्थामासोबतचा तिचा फोटो देखील समाविष्ट आहे, ज्यामध्ये ती आरतीची थाळी धरून कारमध्ये पूजा करताना दिसत आहे.
नवीन लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी LWB ही 5 सीटर लक्झरी कार आहे जिची मुंबईत किंमत 3.81 कोटी आहे. रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी LWB (लाँग व्हीलबेस) ही लँड रोव्हरची अल्ट्रा लक्झरी आणि प्रीमियम SUV आहे. ही SUV लांब व्हीलबेससह येते, याचा अर्थ तिला नेहमीपेक्षा जास्त केबिन जागा आणि फीचर्स मिळतात.
हे देखील वाचा: या किंमतीत लाँच झाली अपडेटेड Citroen C3 Aircross, जाणून घ्या फीचर्स
इंजिन पर्याय
ही कार वेगवेगळ्या इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरियंटचा समावेश आहे. प्लग-इन हायब्रीड तंत्रज्ञान काही व्हेरियंटमध्ये देखील दिले जाते. 4.4 लिटर V8 इंजिन 523 bhp पॉवर आणि 750 Nm टॉर्क जनरेट करते.
लांबी आणि व्हीलबेस:
LWB व्हेरिएंट मानक मॉडेलपेक्षा लांब आहे, ज्यामुळे मागील सीटच्या प्रवाशांना अधिक लेगरूम मिळतात.
याची लांबी अंदाजे 5.25 मीटर (वेरिएंटवर अवलंबून बदलू शकतात). तर व्हीलबेस अंदाजे 3.19 मीटर, ज्यामुळे केबिनची जागा बरीच मोठी आहे.
सुरक्षा आणि तंत्रज्ञान:
एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) सह येते, ज्यामध्ये ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. यातील 3D सराउंड कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि एअर सस्पेन्शन यांसारखी फीचर्स ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आरामदायी बनवतात.