फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे एवढे मोठे आहे की त्यात फक्त भारतीय ऑटो कंपनीज नाही तर जगभरातील कंपनीज कार्यरत आहे. बदलत्या काळानुसार ग्राहकांची कारबद्दल असणारी अपेक्षा सुद्धा बदलत आहे. अशावेळी प्रत्येक ऑटो कंपनी ही नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन कार्स बाजारात आणत असते.
फ्रेंच ऑटोमोबाईल उत्पादक Citroen भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. नुकतेच त्यांनी C3 Aircross कंपनीने अपडेटसह लाँच केले आहे. त्यात कोणते बदल करण्यात आले आहेत आणि आता ते कोणत्या किंमतीला खरेदी केली जाऊ शकते? त्याची डिलिव्हरी कधी सुरू होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
कंपनीच्या माहितीनुसार, Citroen C3 Aircross च्या नवीन व्हर्जनमध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑटो एसी, पॉवर विंडो स्विच, पॅसेंजर साइड ग्रॅब हँडल, पॉवर फोल्डिंग ORVM, रिअर एसी व्हेंट, सॉफ्ट टच इन्स्ट्रुमेंट पॅनल यांसारख्या फीचर्ससह अपडेट करण्यात आले आहे. यासोबतच, यात इंटेलिजेंट स्टोरेज सोल्यूशन आणि 360 मिमी कॉम्पॅक्ट स्टीयरिंग व्हील, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 40 कनेक्टिव्हिटी फीचर्स सोबत MyCitroen Connect ॲप आणि 70 हून अधिक ॲक्सेसरीजसह कस्टमायझेशन ऑप्शन देण्यात आले आहेत.
Citroen ने SUV च्या सुरक्षेकडे देखील खूप बारकाईने लक्ष दिले आहे. कंपनीने ही कार अपडेट करण्यासोबत तिला अधिक सुरक्षित बनवली आहे. आता यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि हिल-होल्ड असिस्ट यासारखी 40 हून अधिक ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
हे देखील वाचा: टाटा पंचला टक्कर देण्यासाठी सिट्रॉन इंडियाची झेप? लाँच केली C3 ऑटोमॅटिक कार
कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे Gen3 Puretech 110 Turbo आणि Puretech 82 नॅचरली एस्पिरेटेड इंजिन दिले आहेत. यात पाच स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे. 5+2 व्हेरियंटसाठी तुम्हाला 35 हजार रुपये वेगळे द्यावे लागतील. त्यासाठीचे बुकिंग आजपासून म्हणजेच 30 सेप्टेंबपसून सुरू करण्यात आले असून 8 ऑक्टोबरपासून या कारची डिलिव्हरी सुरू होणार आहे.