फोटो सौजन्य: Social Media
भारतात ज्याप्रमाणे कार्स लाँच होत आहेत त्याचप्रमाणे अनेक बाईक्स सुद्धा लाँच होत आहे. आधी पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्सच मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. पण आता इलेक्ट्रिक बाईक्स सुद्धा मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. एवढेच काय आता तर जगातील पहिली सीएनजी बाईक सुद्धा मार्केटमध्ये आली आहे, ज्याचा मायलेज पेट्रोल बाईक्स पेक्षा खूप जास्त आहे. चला या बाईकबद्दल अधिक जाणून घेऊया.
हे देखील वाचा: या किंमतीत लाँच झाली अपडेटेड Citroen C3 Aircross, जाणून घ्या फीचर्स
बजाजने काही महिन्यांपूर्वीच आपली CNG बाईक Freedom 125 बाजारात आणली आहे. ज्यांना कमी खर्चात जास्त अंतर कापायचे आहे अशा लोकांना लक्षात घेऊन या बाइकची रचना करण्यात आली आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत ₹ 95,000 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तुम्हालाही ही बाईक घ्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
बजाज फ्रीडम 125 अशा लोकांसाठी बनवण्यात आले आहे ज्यांना कमी खर्चात उत्तम बाईक हवी आहे. सीएनजीवर चालवणाऱ्या या बाईकचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत 50 टक्के कमी असेल. या बाईकमध्ये एक छोटी पेट्रोल टाकी देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही गरजेनुसार पेट्रोल सुद्धा वापरू शकता. उजव्या हँडलबारवर एक स्विच आहे जो दाबून तुम्ही पेट्रोल आणि CNG मध्ये बदल करू शकता. पेट्रोल टाकीच्या खाली सीएनजी टाकी ठेवली असून ही बाईक इतर बाईकपेक्षा वेगळी दिसत नाही.
बजाजचा दावा आहे की फ्रीडम 125 ची सीएनजी टाकी एकदा फुल्ल भरल्यावर ती 213 किलोमीटरपर्यंत धावू शकते आणि पेट्रोल टाकीवर अतिरिक्त 117 किलोमीटर, म्हणजे एकूण 330 किलोमीटर. सीएनजीवर चालताना या बाईकचे मायलेज 102 किलोमीटर प्रति किलोग्राम असते आणि पेट्रोलवर चालताना ते 64 किलोमीटर प्रति लिटर होते.
बजाज फ्रीडम 125 मध्ये सिंगल 125 सीसी इंजिन आहे जे एअर कूल्ड आहे. हे इंजिन 9.4 bhp पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क देते. या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन आहे. ब्रेकिंगसाठी, समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहे. या बाईकमध्ये 17 इंची अलॉय व्हील आहेत.