Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया इंडियाने कारची वॉरंटी वाढवली, आता मिळणार ७ वर्षांची हमी

नवीन आणि सध्याच्या ग्राहकांना अधिक सुरक्षित व विश्वासार्ह सेवा मिळेल. सेल्टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्स या मॉडेल्ससाठी ही योजना उपलब्ध असून, यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 24, 2025 | 06:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय वाहन बाजारपेठेत आपली मजबूत पकड निर्माण केलेल्या किया इंडियाने ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या वाहनांच्या वॉरंटी कालावधीत वाढ करून ती आता ५ वर्षांवरून थेट ७ वर्षांपर्यंत नेली आहे. हा निर्णय कंपनीच्या “ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा” देण्याच्या उद्देशाचा एक भाग आहे.

फक्त करिअर नव्हे तर जीवन घडवणारे शिक्षण! TFI वर्गात शिकलेल्या आयुषची यशोगाथा

किया सेल्टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्स या कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल्ससाठी ही नवीन योजना लागू आहे. सध्या ५ वर्षांची वॉरंटी असलेल्या ग्राहकांना ३२,१७० रुपयांपासून (कर वगळून) सुरू होणाऱ्या ५+२ वर्षांच्या कव्हरेजमध्ये अपग्रेड करता येईल. तर नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ७ वर्षांची वॉरंटी ४७,२४९ रुपयांपासून (कर वगळून) उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा देशभरातील सर्व अधिकृत किया डीलरशिपवर उपलब्ध असेल.

किया इंडियाचे विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, ”किया इंडिया ग्राहकांसाठी फायदे वाढवण्‍याप्रती आणि परिपूर्ण मन:शांतीची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आमचे वॉरंटी कव्‍हरेज नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी जवळपास ७ वर्षांपार्यंत वाढवत आम्‍ही आमच्‍या वेईकल्‍सचा टिकाऊपणा व दर्जावरील आत्‍मविश्वासाची खात्री देतो, तसेच आमच्‍या अधिकृत सर्विस नेटवर्कच्‍या माध्‍यमातून सतत पाठिंबा देत आहोत. हा उपक्रम प्रत्‍येक किया ग्राहकाला अपवादात्‍मक मालकीहक्‍क अनुभव आणि दीर्घकालीन मूल्य देण्‍याप्रती आमच्‍या विद्यमान कटिबद्धतेचा भाग आहे.”

दिल्ली NCR मध्ये कुत्रिम पावसाची जय्यत तयारी! हे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या 

या उपक्रमामुळे किया वाहनधारकांना देखभाल खर्चात मोठा फायदा मिळणार असून, त्यांच्या वाहनांच्या पुनर्विक्री किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनीच्या या पावलामुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास आणखी दृढ होईल. किया इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम अनुभव देण्याचा ध्यास कायम ठेवला आहे. त्यांच्या विविध सेवा योजनांमुळे आणि नव्या ऑफर्समुळे कंपनीने भारतीय वाहन बाजारात एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एकूणच, किया इंडियाची ही ७ वर्षांची विस्तारित वॉरंटी योजना ही केवळ सेवा नव्हे, तर ग्राहकांशी असलेल्या दीर्घकालीन नात्याचा एक ठोस पुरावा ठरते.

Web Title: Kia india extends car warranty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • Kia Motors

संबंधित बातम्या

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड
1

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.