फोटो सौजन्य: Social Media
जरी हे 2024 चं वर्ष संपायला आले असले तरी नवीन वाहनं लाँच होण्याच्या काही थांबत नाही आहे. डिसेंबरच्या महिन्यात अनेक उत्तम कार्स आतापर्यंत लाँच झाल्या आहेत. या लाँच झालेल्या कार्सना ग्राहकांनाच उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतेच आता किया मोटर्सने भारतात आपली उत्तम कार लाँच केली आहे.
साऊथ कोरियन वाहन निर्माता कंपनी कियाने आपली नवीन एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच केली आहे. कंपनीकडून Kia Syros अत्याधुनिक फीचर्ससह मार्केटमध्ये आणण्यात आली आहे. या कारचे डिझाइन इतर कार्सपेक्षा वेगळे ठेवण्यात आले आहे. या कारची सुरवातीची किंमत 10 लाखांपासून सुरु होऊ शकते. या कारमध्ये कोणते इंजिन आहे, यातील फीचर्स कोणते आहे, याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या Bullet 350 साठी किती असेल EMI? ‘एवढे’ करावे लागेल डाउन पेमेंट
कंपनीने ही नवीन एसयूव्ही अधिक प्रशस्त बनवली आहे. यात मागे झुकणारी सीट आहे. याशिवाय कंपनीने या एसयूव्हीचे नाव ग्रीक बेटाच्या नावावरून ठेवले आहे.
सायरोसमध्ये क्लायमेट कंट्रोलसाठी 5-इंच स्क्रीनसह 30-इंच डिस्प्ले आहे. यात नवीन टू-स्पोक स्टेअरिंग व्हील आहे, ज्यामध्ये वायरलेस चार्जिंग पॅडसह सेंटर कन्सोल देखील आहे. डॅशबोर्डमध्ये HVAC कंट्रोलसाठी फिजिकल स्विचचा बँड देखील आहे.
याशिवाय, सायरोसला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी ओटीए अपडेट, इन-कार कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी, चारही हवेशीर सीट्स, सेंटर आर्मरेस्ट, 60:40 स्प्लिट-फोल्डिंग फंक्शन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, 8- सुद्धा मिळते. स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम, ड्युअल-पेन पॅनोरमिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, सहा एअरबॅग्ज, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS सूट सारखी फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.
Year Ender 2024: ‘या’ आहेत 2024 मधील Best Cars, खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमीच असते गर्दी
कंपनीने Kia Syros SUV मध्ये 1 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम इंजिन दिले आहे. यामुळे याला 120 पीएस पॉवर आणि 172 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. हे 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह आणले गेले आहे. यासोबतच यात 1.5 लीटर क्षमतेचे डिझेल इंजिन देखील देण्यात आले आहे, जे याला 116 पीएस पॉवर आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क देईल.
या SUV साठी बुकिंग जानेवारी 2025 पासून सुरू होईल तर त्याची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. ही SUV चार स्टँडर्ड ट्रिम्स आणि 2 ऑप्शन ट्रिम्स HTK, HTK (O), HTK+, HTX आणि HTX+, HTX+(O) मध्ये ऑफर केली जाते.
सायरोस SUV ही Kia ने भारतीय मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये आणली आहे. या सेगमेंटमध्ये टाटा, मारुती, ह्युंदाई यासारख्या कंपन्यांच्या एसयूव्हीशी ही कार थेट स्पर्धा करेल.