Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायनेटिक ग्रीनची जिओथिंग्‍ज सोबत भागीदारी; इलेक्ट्रीक वाहनांसाठी निर्माण करणार खास प्लॅटफॉर्म

कायनेटिक ग्रीन एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी उत्‍पादक कंपनीने जिओथिंग्‍ज सोबत भागीदारी केली आहे. या सहयोगाद्वारे इलेक्ट्रीक वाहनांसाठी खास प्लॅटफॉर्म निर्माण केले जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 10, 2024 | 07:06 PM
कायनेटिक ग्रीनची जिओथिंग्‍ज सोबत भागीदारी; इलेक्ट्रीक वाहनांसाठी निर्माण करणार खास प्लॅटफॉर्म
Follow Us
Close
Follow Us:

कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्‍यूशन्‍स लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी उत्‍पादक कंपनीने जिओ प्‍लॅटफॉर्म्‍स लिमिटेडची उपकंपनी आणि रिलायन्‍स ग्रुपचा भाग असलेल्‍या जिओथिंग्‍ज सोबत भागीदारी केली आहे.  हा सहयोग कायनेटिक ग्रीनच्‍या विद्यमान व आगामी इलेक्ट्रिक वेईकल मॉडेल्‍ससाठी कनेक्टिव्‍हीटी आणि युजर अनुभवांमध्‍ये वाढ करत शाश्‍वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रगत करण्‍यामधील मोठा टप्‍पा मानला जात आहे.

डिजिटल, कनेक्‍टेड डिस्‍प्‍ले प्‍लॅटफॉर्म

या सहयोगाचा भाग म्‍हणून कायनेटिक ग्रीन नाविन्‍यपूर्ण स्‍मार्ट टीएफटी-आधारित डिजिटल, कनेक्‍टेड डिस्‍प्‍ले प्‍लॅटफॉर्मचे अनावरण करत आहे, ज्‍याचा त्‍यांच्‍या लोकप्रिय ई२डब्‍ल्‍यू (इलेक्ट्रिक दुचाकी) प्‍लॅटफॉर्म्‍सवरील ग्राहकांसाठी राइडिंग अनुभवामध्‍ये क्रांती घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. या प्रगत डिस्‍प्‍लेमध्‍ये आवश्‍यक वैशिष्‍ट्ये आहेत, जसे रिअल-टाइम नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल्‍ससाठी नोटिफिकेशन्‍स आणि जवळच्‍या चार्जिंग स्‍टेशन्‍सबाबत माहिती. या घटकांचा समावेश करत प्‍लॅटफॉर्म राइडर्सना अधिक कनेक्‍टेड व सुखकर प्रवासाचा आनंद घेण्‍यास सक्षम करतो, तसेच प्रत्‍येक राइड कार्यक्षम व उत्‍साहवर्धक करतो. शहरातील रस्‍त्‍यांवरून नेव्हिगेट करायचे असो किंवा लांबच्‍या प्रवासाचे नियोजन करायचे असो हे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान युजर्सना सोईस्‍करपणे महत्त्वपूर्ण माहिती देत सक्षम करते.

तसेच, हा सहयोग बिल्‍ट-इन ब्‍ल्‍यूटूथ आणि टेलिमॅटिक्‍स-सक्षम डिवाईस यांसारख्‍या प्रमुख वैशिष्‍ट्यांना सादर करतो, ज्‍यामधून विनासायास कनेक्‍टीव्‍हीटीची खात्री मिळते. यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍सच्‍या आवश्‍यक वेईकल फंक्‍शन्‍सवर देखरेख ठेवण्‍यासोबत व्‍यवस्‍थापन करू शकतात. राइडर्सना नेव्हिगेशन, स्‍पीड, बॅटरी चार्ज स्थिती आणि डिस्‍टन्‍स टू एम्‍प्‍टी याबाबत माहिती मिळू शकते, ज्‍यामधून उच्‍च युजर-अनुकूल अनुभव मिळतो. एकीकृत सोल्‍यूशन जिओच्‍या प्रगत हार्डवेअरचा फायदा घेते, ज्‍याला प्रबळ ४जी कनेक्‍टीव्‍हीटीचे अधिक पाठबळ आहे.हे नाविन्‍यपूर्ण एकीकरण स्‍मार्ट वेईकल टेक्‍नॉलॉजीमधील मोठ्या सुधारणेला सादर करते, जेथे उपयुक्‍तता, सुरक्षितता आणि कनेक्‍टीव्‍हीटीला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

एआय-आधारित ड्रायव्‍हर माहिती व राइड असिस्‍टण्‍स वैशिष्‍ट्ये

कायनेटिक ग्रीनच्‍या सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी म्‍हणाल्‍या, ”कायनेटिक ग्रीनचा जिओथिंग्‍जसोबतच्‍या सहयोगामधून ईव्‍ही तंत्रज्ञान, नाविन्‍यता आणि पर्यावरणीय स्थिरतेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. या सहयोगाचा फायदा घेत आमचा प्रगत सॉफ्टवेअर प्‍लॅटफॉर्म्‍स आणि डिजिटल सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याचा मनसुबा आहे, जे इलेक्ट्रिक वेईकल युजर अनुभवांमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतात. आमचा राइडर्सना विनासायास कनेक्‍टीव्‍हीटी, सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये, सुरक्षितता आणि अपवादात्‍मक सोयीसुविधा देण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही भावी सोल्‍यूशन्‍ससह एआय-आधारित ड्रायव्‍हर माहिती व राइड असिस्‍टण्‍स वैशिष्‍ट्ये निर्माण करत राहू, ज्‍यामधून आमची प्रबळ ईव्‍ही उत्‍पादने आणि प्‍लॅटफॉर्म्‍समध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असण्‍याची खात्री मिळेल.”

इलेक्ट्रिक गतीशीलतेला चालना देण्‍याच्‍या दिशेने मोठी झेप

जिओ प्‍लॅटफॉर्म्‍स लिमिटेडचे अध्‍यक्ष श्री. आशिष लोढा म्‍हणाले, ”आम्‍हाला नाविन्‍यपूर्ण आणि शाश्‍वत इलेक्ट्रिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यासाठी कायनेटिक ग्रीनसोबतच्‍या आमच्‍या सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. हा दीर्घकालीन सहयोग भारतात इलेक्ट्रिक गतीशीलतेला चालना देण्‍याच्‍या दिशेने मोठी झेप आहे. सहयोगाने, आम्‍ही अधिक शाश्‍वत भविष्‍याला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

कायनेटिक ग्रीन आणि जिओथिंग्‍ज या उदयोन्‍मुख सहयोगाला सुरूवात करत असताना दोन्‍ही कंपन्‍यांनी इलेक्ट्रिक वेईकल तंत्रज्ञानामधील प्रगतीमध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्‍यामुळे अधिक कनेक्‍टेड, कार्यक्षम व शाश्‍वत असलेले भविष्‍य घडवण्‍याचा मार्ग सुकर होईल.

Web Title: Kinetic green partners with geothings to create a dedicated platform for electric vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 07:06 PM

Topics:  

  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

मोठी बातमी! दिल्लीतील ‘जुन्या’ वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप
1

मोठी बातमी! दिल्लीतील ‘जुन्या’ वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप

EV Vs Petrol: पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त झाले इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, रिसर्चमध्ये आकडे आले समोर
2

EV Vs Petrol: पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त झाले इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, रिसर्चमध्ये आकडे आले समोर

E-Battery Swapping : मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी
3

E-Battery Swapping : मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी

UP वाले ‘या’ बाबतीत महाराष्ट्राच्याही पुढे ! दिल्लीच्याही वरचढ ठरलंय उत्तर प्रदेश
4

UP वाले ‘या’ बाबतीत महाराष्ट्राच्याही पुढे ! दिल्लीच्याही वरचढ ठरलंय उत्तर प्रदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.