Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!

भारतातील Electric Car Market मध्ये टाटा मोटर्सने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, पण दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महिंद्राने एमजीला मागे टाकले. अवघ्या 10 महिन्यांत महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारच्या नोंदणीत 124 टक्के वाढ झाली. नेमक्या कोणत्या कंपन्यांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 11, 2026 | 04:58 PM
India’s Top Electric Car Brands 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)

India’s Top Electric Car Brands 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सने 1,16,732 इलेक्ट्रिक कारची नोंदणी करत भारतातील 39.7 टक्के मार्केट शेअर मिळवला.
  • महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारच्या नोंदणीत 124 टक्के वाढ झाली असून कंपनीने एमजीला मागे टाकले.
  • ऑक्टोबर 2026 मध्ये देशभरात 36,911 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली, जी मागच्या वर्षापेक्षा 76 टक्के जास्त आहे.

भारतातील Electric Car Market मध्ये 2026 च्या जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांच्या कालावधीत टाटा मोटर्सने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे, महिंद्रा इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. यामुळे JSW एमजी मोटर इंडियाला तिसऱ्या प्लेसवर समाधान मानावे लागले. वाहन पोर्टलच्या 4 नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात या काळात एकूण 2,93,877 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली.

टाटा मोटर्सने 1,16,732 इलेक्ट्रिक कारची नोंदणी करत 39.7 टक्के मार्केट शेअर मिळवला. तर महिंद्राने 67,023 युनिट्सची नोंदणी केली. मागच्या वर्षी याच कालावधीत महिंद्राची विक्री 29,934 युनिट्स होती. म्हणजेच कंपनीने तब्बल 124 टक्के वाढ नोंदवली. बीई 6, एक्सईव्ही 9ई, एक्सईव्ही 9एस आणि एक्सयूव्ही 3एक्सओ ईव्ही या मॉडेल्सचा कंपनीला फायदा झाला. दुसरीकडे, MG मोटरने 55,082 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली.

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला 3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर

या लिस्टमध्ये व्हिनफास्टने 15,468 युनिट्ससह चौथे स्थान मिळवले. मारुती सुझुकी 12,051 युनिट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. किया 7,029 युनिट्ससह सहाव्या, तर बीवायडी 6,490 युनिट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. ह्युंदाईने 5,791 युनिट्सची नोंदणी करत आठवे प्लेस मिळवले. BMW 4,132 युनिट्ससह नवव्या आणि मर्सिडीज-बेंझ 1,387 युनिट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे.

बीवायडीने मागच्या वर्षीच्या 5,555 युनिट्सच्या तुलनेत यंदा 16.8 टक्के वाढ नोंदवली. तर ह्युंदाईच्या नोंदणीत 12.5 टक्क्यांची घट झाली. भारतात बीवायडी अॅटो 3, ईमॅक्स 7, सील आणि सीलायन 7 ही मॉडेल्स विकते. तर ह्युंदाईकडे क्रेटा इलेक्ट्रिक आणि आयोनिक 5 हे ऑप्शन आहेत. मारुती सुझुकीच्या ई विटाराचाही विक्रीत सहभाग आहे.

बॅटरी भाड्याने घ्या आणि कार चालवा! सिट्रॉन e-C3X चा भारतीय बाजारात मास्टरस्ट्रोक!

ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण 36,911 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली. यात टाटा मोटर्सने 14,654, महिंद्राने 8,541 आणि एमजीने 5,938 युनिट्सची नोंद केली. विशेष म्हणजे, ऑक्टोबरमध्ये कियाने 1,395 युनिट्ससह मारुती सुझुकीला मागे टाकले. तर टाटा आणि महिंद्रा या दोन कंपन्यांचा एकत्रित मार्केट शेअर 62.5 टक्के राहिला. ऑक्टोबरमधील एकूण नोंदणी मागच्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 76 टक्क्यांनी जास्त होती.

Web Title: Top 10 ev brands india 2026 sales auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Cars
  • Electric Vehicles
  • Mahindra
  • tata motors

संबंधित बातम्या

टीव्हीएस अपाचे RR 310 ची इटलीत ऐतिहासिक एन्ट्री! मिसानो रेसिंग ट्रॅकवर भारतीय रायडर्सचा जलवा
1

टीव्हीएस अपाचे RR 310 ची इटलीत ऐतिहासिक एन्ट्री! मिसानो रेसिंग ट्रॅकवर भारतीय रायडर्सचा जलवा

एथर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री 3 लाखांच्या पार! 2026 मध्ये 67% वाढ, मार्केट शेअरही विक्रमी पातळीवर
2

एथर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री 3 लाखांच्या पार! 2026 मध्ये 67% वाढ, मार्केट शेअरही विक्रमी पातळीवर

नवीन ह्युंदाई क्रेटा टेस्टिंगदरम्यान दिसली; बॉक्सी डिझाइन, ADAS आणि हायब्रिड इंजिनची मिळणार साथ!
3

नवीन ह्युंदाई क्रेटा टेस्टिंगदरम्यान दिसली; बॉक्सी डिझाइन, ADAS आणि हायब्रिड इंजिनची मिळणार साथ!

रॉयल एनफिल्ड मोटोव्हर्स 2026 मध्ये हिमालयन 750 चे लाँच होणार? Continental GT 750 सह 4 बाइक्सची चर्चा!
4

रॉयल एनफिल्ड मोटोव्हर्स 2026 मध्ये हिमालयन 750 चे लाँच होणार? Continental GT 750 सह 4 बाइक्सची चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.