फोटो सौजन्य: ultraviolette Website
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे. याच मागणीकडे बघता, अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी इंधनावर चालणारी वाहनं उत्पादित करत होत्या, त्याच आज आपले इलेक्ट्रिक वाहन लाँच करत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे ग्राहक देखील EV ला प्राधान्य देत आहे.
आता मार्केटमध्ये अनेक उत्तम आणि बेस्ट रेंज प्रदान करणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक देखील लाँच होत आहे. नुकतेच Ola Electric ने Roadster X ही इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये लाँच केली आहे. सध्या अनेक ई-बाईक उत्पादक कंपन्या आपल्या बाईकच्या लूकवर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. याचे कारण म्हणजे आजच्या तरुणाईला आपली बाईक स्टायलिश लूकमध्ये हवी असते. आज आपण अशाच एका इलेक्ट्रिक बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या लूकसमोर सुपरबाईक्स देखील फिक्या पडल्या आहेत.
Zepto ला मानला बॉस ! iPhone नंतर आता चक्क करणार ‘या’ लक्झरी कंपनीच्या कारची डिलिव्हरी
बेंगळुरूस्थित ईव्ही स्टार्टअप, Ultraviolette ने त्यांचे दुसरे इलेक्ट्रिक बाईक मॉडेल, F77 सुपरस्ट्रीट, 2.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केले आहे. नावाप्रमाणेच, ही बाईक F77 Mach 2 पेक्षा जास्त रोड सेंट्रिक आहे. ही एक शक्तिशाली इलेक्ट्रिक बाईक आहे जी स्पोर्टी डिझाइन तसेच उत्तम रेंज देते.
पहिल्या दृष्टीक्षेपात, Ultraviolette F77 आणि F77 Mach 2 सारख्याच दिसतात. पण F77 सुपरस्ट्रीट क्लिप-ऑनऐवजी ट्यूबलर हँडलबार वापरते. यामुळे रायडरचे एर्गोनॉमिक्स थोडे सोपे होते. रायडरच्या मागच्या पोजीशनमध्ये २५ अंशांचा बदल आहे, ज्यामुळे ही बाईक F77 Mach 2 पेक्षा कमी कमिटेड बनते. पुढचा मोठा बदल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आहे, जो एका नवीन बेसवर बसतो आणि चांगले अँगल ऑफर करतो.
Ola Electric चा मार्केटमध्ये धमाका ! तब्बल 500 KM ची रेंज असणारी इलेक्ट्रिक बाईक केली लाँच
या दोन बदलांव्यतिरिक्त, F77 सुपरस्ट्रीट ही F77 मॅक 2 सारखीच आहे, ज्यामध्ये समान सस्पेंशन सेटअप, 17-इंच चाके, TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्रेकिंग हार्डवेअर, रीजनरेटिव्ह ब्रेकिंगचे 10 स्तर, ABS मोड, राइड मोड, ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आहे. दोन्ही बाईकचा बॅटरी पॅक देखील सारखाच आहे – एक 10.3kWh युनिट जे 323 किमीची रेंज देते आणि 155 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देऊ शकते.
जरी त्यांच्यात जवळजवळ सर्व समानता असली तरी, कोणती बाईक विकत घ्यावी हे रायडर्सच्या गरजांवर अवलंबून असते. जर तुम्हाला स्पोर्टीनेस आवडत असेल तर F77 Mach 2 तुमच्यासाठी उत्तम बाईक ठरेल. जर तुम्ही कम्फर्ट, परफॉर्मन्स आणि लॉंग ट्रिपसाठी वापरता येईल असा बॅटरी पॅक असलेल्या बाईकच्या शोधात असाल, तर F77 सुपरस्ट्रीट हा एक चांगला पर्याय आहे.