फोटो सौजन्य: Ola electric X अकाउंट
इलेक्ट्रिक स्कूटर म्हंटलं की अनेकांना ओला इलेक्ट्रिक ही कंपनी आठवते. कंपनीने आतापर्यंत उत्तम आणि चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या स्कूटर मार्केटमध्ये आणल्या आहे, ज्याला ग्राहकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये ओलाने आपल्या पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक बाईक्स भारतीय मार्केटमध्ये लाँच केल्या होत्या. आता 2025 मध्ये कंपनीने Roadster X ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे.
Skoda Kylaq च्या ऑटोमॅटिक व्हर्जनसाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले,आता किती द्यावा लागेल EMI?
ओलाने भारतात त्यांची इलेक्ट्रिक बाईक ओला रोडस्टर एक्स लाँच केली आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी या बाईकला पहिल्यांदा सादर करण्यात आले होते. तेव्हा त्याच्या किंमती आधीच खुलासा झाला होता. ही बाईक Roadster X आणि Roadster X+ या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. चला या बाईकच्या फीचर्स आणि अन्य गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
या बाईकमध्ये चेन ड्राइव्हसह अधिक शक्तिशाली मिड-माउंटेड मोटरसारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्याचे पुढचे सस्पेंशन RSU टेलिस्कोपिक फोर्क्स आहे आणि मागील सस्पेंशनमध्ये ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स आहेत. हे सिंगल-पीस सीट, सिंगल-पीस ग्रॅब्रेल, अलॉय व्हील्स, साडी गार्ड, फ्रंट डिस्क ब्रेक, सिंगल-चॅनेल एबीएस, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, ब्रेक-बाय-वायर आणि उद्योगातील पहिले फ्लॅट केबल इम्प्लीमेंटेशन यासारख्या फीचर्सने सुसज्ज आहे.
‘या’ मेड इन इंडिया कारची जपानी लोकांना भुरळ, रेकॉर्डब्रेक मागणीनंतर बुकिंग थांबवली
ओला रोडस्टर एक्स (Ola Roadster X)
2.5kWh: यात 7 किलोवॅटची मोटर आहे, जी 105 किमी प्रतितासचा टॉप स्पीड आणि 117 किमीची रेंज देते. 350 वॅट चार्जरच्या मदतीने ही बाईक 6.2 तासांत 0-80 टक्के चार्ज करता येते.
3.5kWh: यात 7 किलोवॅटची मोटर आहे, जी 117 किमी प्रतितासचा टॉप स्पीड आणि 159 किमीची रेंज देते. 750 वॅट चार्जरच्या मदतीने ही बाईक 4.6 तासांत 0-80 टक्के चार्ज करता येते.
4.5kWh: यात 7 किलोवॅटची मोटर आहे, जी 124 किमी प्रतितासचा टॉप स्पीड आणि 200 किमीची रेंज देते. 750 वॅट चार्जरच्या मदतीने ही बाईक 5.9 तासांत 0-80 टक्के चार्ज करता येते.
ओला रोडस्टर एक्स+ (Ola Roadster X+)
4.5kWh: यात 11 किलोवॅटची मोटर आहे, जी 125 किमी प्रतितासचा टॉप स्पीड आणि 252 किमीची रेंज देते. 750 वॅट चार्जरच्या मदतीने ही बाईक 5.9 तासांत 0-80 टक्के चार्ज करता येते.
9.1kWh: यात 11 किलोवॅटची मोटर आहे, जी 125 किमी प्रतितासचा टॉप स्पीड आणि 501 किमीची रेंज देते. 1000 वॅट चार्जरच्या मदतीने ही बाईक ८ तासांत 0-80 टक्के चार्ज करता येते.
या बाईकची किंमत ही व्हेरियंटनुसार वेगवेगळी आहे. यासाठीच खालील तक्त्यात या बाईकच्या किंमतीबद्दल माहिती दिली आहे.
व्हेरियंट | किंमत (एक्सशोरूम) | किंमत (11 फेब्रुवारीनंतर) |
---|---|---|
Ola Roadster X 2.5kWh | 74,999 रुपये | 89,999 रुपये |
Ola Roadster X 3.5kWh | 84,999 रुपये | 99,999 रुपये |
Ola Roadster X 4.5kWh | 94,999 रुपये | 1,09,999 रुपये |
Ola Roadster X+ 4.5kWh | 1,04,999 रुपये | 1,19,999 रुपये |
Ola Roadster X+ 9.1 kWh | 1,54,999 रुपये | 1,69,999 रुपये |